गैरहजर उमेदवारांना १० जुलैला आणखी एक संधी

गैरहजर उमेदवारांना १० जुलैला आणखी एक संधी

Published on

पिंपरी, ता. ४ : पोलिस शिपाईपदाच्या भरती प्रक्रियेत गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. त्याबाबतचा निर्णय पोलिस भरती निवड मंडळाने घेतला आहे. ज्या गैरहजर उमेदवारांनी तारीख वाढवून घेतलेली नाही, अशा उमेदवारांनाही आता १० जुलैला मैदानी चाचणी देता येणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस दलात शिपाई पदाच्या २६२ जागांसाठी भोसरीतील इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे भरती प्रक्रिया १९ जून ते १० जुलै या कालावधीत राबवली जात आहे. त्यासाठी पंधरा हजार ४२ अर्ज आले.
दरम्यान, काही उमेदवारांनी वेगवेगळ्या घटकांसाठी एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज केल्याने त्यांना एकाच दिवशी मैदानी चाचणीसाठी हजर राहणे शक्य झाले नाही. त्यामुळे, असे उमेदवार काही ठिकाणच्या मैदानी चाचणीसाठी गैरहजर राहिले. मात्र, त्यांच्या विनंतीवरून दुसरी तारीख देण्यात आली. तसेच जे उमेदवार गैरहजर आहेत व त्यांनी यापूर्वी तारीख वाढवून घेतलेली नाही, अशा गैरहजर उमेदवारांना देखील एक संधी देण्याचा निर्णय भरती मंडळाने घेतला आहे. शारीरिक चाचणीसाठी तारीख वाढवून न घेतलेल्या उमेदवारांनी १० जुलैला इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.