robotic kidney operation
robotic kidney operation

Kidney Robotic Operation: विज्ञानाची कमाल ! ‘रोबोटिक’ शस्त्रक्रियेद्वारे महिलेचे मूत्रपिंड वाचविण्यात यश

सहा तारखेला ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर अवघ्या चारच दिवसांत महिलेला डिस्चार्ज देण्यात आला

पिंपरी, ता. १३ ः रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे मूत्रपिंडाजवळील गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आल्याने २९ वर्षांच्या महिलेला जीवनदान मिळाले आहे. पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली. संबंधित महिलेला घरी सोडण्यात आले असून ती पूर्णपणे निरोगी जीवन जगत असल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

मोशी येथील एक महिला पोटात दुखत असल्याने डिसेंबर महिन्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी तपासणीमध्ये महिलेच्या मूत्रपिंडाजवळ ६ सेंटीमीटर आकाराची गाठ आढळून आली. या गाठीमुळे मूत्रपिंड अर्धे झाकल्याने महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत रुग्णाचे मूत्रपिंड काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, रुग्णालयातील रोबोटिक विभागाचे संचालक डॉ. हिमेश गांधी यांनी रोबोटिक शस्त्रक्रिया करून ती गाठ काढण्याचा सल्ला दिला.

मूत्रपिंडासारख्या नाजूक अवयवाला धक्का न लागता ती गाठ काढणे मोठे आव्हान होते. परंतु, रुग्णालयातील तज्ज्ञांनी अद्ययावत रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे आव्हान यशस्वीरित्या पेलले. सुमारे दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेत पाच ठिकाणी छोटी छिद्रे घेण्यात आली. त्यामुळे, रक्तस्राव कमी झाला. सहा तारखेला ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर अवघ्या चारच दिवसांत महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. आता ती महिला पूर्णपणे बरी झाली असून सर्वसामान्य आयुष्य जगत आहे, असे डॉ.गांधी यांनी सांगितले.

‘आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही नेहमीच अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत आहोत. देशपातळीवर उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यामध्ये आमचे रुग्णालय त्यामुळे सातत्याने आघाडीवर आहे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध केल्यामुळे प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांना गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये रुग्णांवर अचूक शस्त्रक्रिया करणे शक्य होत आहे.’
- डॉ.पी.डी.पाटील, कुलपती, डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ

खरे तर ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. अनेक रुग्णालयांनी त्या महिलेला मूत्रपिंड काढण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आम्ही रुग्णाच्या मूत्रपिंडाला धक्का न लावता त्याच्या शेजारील गाठ काढली. त्यामुळे, मूत्रपिंड वाचले व महिलेलाही जीवनदान मिळाले.
- डॉ. हिमेश गांधी, संचालक, मूत्र रोग आणि कर्करोग शल्यचिकित्सक, रोबोटिक शस्त्रक्रिया विभाग, डीपीयू रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com