नीरवचे पाच बळी; सार्थच्या दमदार ८१ धावा

नीरवचे पाच बळी; सार्थच्या दमदार ८१ धावा

पिंपरी, ता. २५ ः व्हेरॉक चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये ‘यंगस्टर’,‘आर्यन्स’, ‘स्पार्क’ आणि ‘रायझिंग स्टार’ संघांनी गुरुवारी साखळी सामन्यात प्रतिस्पर्धी संघांना हरविले. नीरव सरनोत (यंगस्टर) याने पाच बळी घेतले. तर सार्थ बडदे (आर्यन्स) याने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन घडवत ८१ धावांची खेळी केली.
पीसीएमसीज् व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या थेरगाव येथील मैदानावर १२ वर्षांखालील मुलांसाठी ही स्पर्धा भरविण्यात आली आहे.
पहिल्या सामन्यात ‘यंगस्टर’ संघाने गॅरी कर्स्टन अकादमीचा ३३ धावांनी पराभव केला.
नीरव सरनोत याने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन घडवित ५ बळी टिपले. त्यानेच सामनावीराचा किताब पटकाविला. दुसऱ्या सामन्यात ‘आर्यन्स’ने ‘स्पेशलाईज’ संघाला ४१ धावांनी हरविले. सार्थ बडदे याने ५५ चेंडूंत ८१ धावा फटकाविल्या. तुषार टोणपे (नाबाद ६२) याचीही त्याला चांगली साथ लाभली. सार्थ हा सामन्याचा मानकरी ठरला.
तिसऱ्या सामन्यात ‘स्पार्क’ने ‘ट्रिनिटी’वर २६ धावांनी विजय मिळविला. विवान कुलकर्णी सामनावीर ठरला. त्याने तीन बळी घेतले. अखेरच्या साखळी सामन्यात ‘रायझिंग स्टार’कडून ‘चंद्रोस’ला १५ धावांनी पराभव पत्करावा लागला. कृष्णा बुर्टूकणे याने चार बळींसह सामनावीराचा बहुमान प्राप्त केला.
संक्षिप्त धावफलक ः स्पार्क ः २४.२ षटकांत सर्वबाद ९५ - आर्यन जोग ३१ वि.वि. ट्रिनिटी ः २१ षटकांत सर्वबाद ६९ - शौर्य गायकवाड २१ (विवान कुलकर्णी ३/१४, अनय रानडे ३/१२, हित कारिया २/१३); यंगस्टर ः २१.२ षटकांत सर्वबाद ११२ - द्विजेश ढवळे ३३ (३/६) वि.वि. गॅरी कर्स्टन ः १८ षटकांत सर्वबाद ७९ - आर्यन २६ (नीरव सरनोत ५/१८); आर्यन्स ः २५ षटकांत ६ बाद २०० - सार्थ बडदे ८१, तुषार टोणपे नाबाद ६२ (प्रज्वल निंबाळकर ३/२०) वि.वि.स्पेशलाईज ः २५ षटकांत ९ बाद १५९ - साईराज दूरकर ५२, रुद्राक्ष जाधव ४४ (रिशान गायकवाड ३/२१, अनुप जाधव २/३०);
रायझिंग स्टार ः २५ षटकांत ७ बाद १२७ - वीरेन आटोळे ४६, रुद्र पाबळे ३५ (रोनीत चौहान ३/२५, दिव्यांक राक्षे २/१८) वि.वि. चंद्रोस ः २३.१ षटकांत सर्वबाद ११२ - आदित्य स्वामी २५, निरंजन चौरे २४ (कृष्णा बुर्टूकणे ४/२०).

PNE24U15977,PNE24U15978, PNE24U15979, PNE24U15980

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com