‘शिवतांडव’मधून उलगडणार शिवरायांचा इतिहास
‘शिवतांडव’मधून उलगडणार शिवरायांचा इतिहासSakal

‘शिवतांडव’मधून उलगडणार शिवरायांचा इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास आता मराठी रंगभूमीवर उलगडणार आहे. या नाटकाचा संहिता पूजन सोहळा मंगळवारी चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिरात उत्साहात पार पडला.

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास आता मराठी रंगभूमीवर उलगडणार आहे. या नाटकाचा संहिता पूजन सोहळा मंगळवारी चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिरात उत्साहात पार पडला.

चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात येत्या २८ मार्च रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. ‘शिवतांडव’ असे या मराठी नाटकाचे नाव असून अभिनेते शंतनू मोघे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत.

या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाआधीच राज्याच्या विविध भागातून प्रयोगासाठी विचारणा होत असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गोव्यात सुद्धा सहा प्रयोग होणार आहेत. या नाटकात ३७ कलाकार असून या नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्येष्ठ लेखक प्रताप गंगावणे यांनी नाटकाचे लेखन केले आहे.

मागील सहा महिन्यांपासून आम्ही नाटकाची पूर्वतयारी करत आहोत. अडीचशेहून अधिक कलाकारांच्या ऑडिशनमधून कलाकारांची निवड केली आहे. संगीतकार रोहित नागभिडे यांचे संगीत ‘शिवतांडव’ला लाभले आहे. नेपथ्य बाबा पार्सेकर यांचे असून सूत्रधार राजू बंग, भैरवनाथ शेरखाने आहेत.

‘शिवतांडव’मधून उलगडणार शिवरायांचा इतिहास
Pune : आढळराव पाटील यांचा प्रचार करणार; आमदार दिलीप मोहिते; मुंबईतील बैठकीत ठरली रणनीती

यावेळी ‘शिवतांडव’ या नाटकाचे निर्माते, अ. भा. नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, दिग्दर्शक दिलीप भोसले, अभिनेते शंतनू मोघे यांच्यासह नाटकातील अन्य कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.  ‘‘भव्य नेपथ्य, उत्तम संगीत, काळजाचा ठाव घेणारी गाणी आणि दमदार संवाद यामधून हे नाटक रसिकांची मने जिंकण्यात यशस्वी होईल,’’ असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला.

नाटकामधून शिवरायांचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न
नाटकाबद्दल माहिती देताना दिग्दर्शक दिलीप भोसले म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्माण होण्यापूर्वी आपण मुघलांच्या आधिपत्याखाली होतो. शिवाजी महाराज म्हटले की नाटक, सिनेमातून एक विशिष्ट पद्धतीने दाखवले जातात. मात्र, आम्ही ‘शिवतांडव’ नाटकामधून शिवाजी महाराजांचे चौफेर व्यक्तिमत्त्व, त्यांचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.’’

‘शिवतांडव’मधून उलगडणार शिवरायांचा इतिहास
Pune Crime News : आर्थिक फसवणुकीचे सायबर चोरट्यांना ‘क्रेडिट’

चित्रपट, नाटकाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देण्याचा मोरया थिएटर्सचा नेहमी प्रयत्न असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आजच्या पिढीला दाखवण्यासाठी आम्ही ‘शिवतांडव’ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. मोरया गोसावीच्या साक्षीने आज नाटकाच्या संहितेचे पूजन करण्यात आले आहे.
- भाऊसाहेब भोईर, नाटकाचे निर्माते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com