देहू उपाध्यक्षपदाची गुरुवारी निवड

देहू उपाध्यक्षपदाची गुरुवारी निवड
Published on

देहू, ता.१८ ः देहू नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष आणि नामनिर्देशित सदस्य पदासाठी येत्या गुरुवारी (ता.२४) निवडणूक होणार आहे. हवेलीचे प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत कार्यालयात होणाऱ्या विशेष सभेत ही निवड होणार आहे. विद्यमान उपाध्यक्षांची मुदत नुकतीच संपली आहे.
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे उपाध्यक्षपदासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यानंतर अर्ज छाननी होईल. छाननीनंतर पंधरा मिनिटांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर लगेच निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. नामनिर्देशित सदस्यासाठी सकाळी दहा ते बारा यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून उपाध्यक्षपदाच्या छाननीबरोबर या अर्जाची छाननी होईल. त्यानंतर लगेच निवडणूक होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Supreme Court on Rajya Sabha Nomination meenakshi natarajan
Chhatrapati Sambhajinagar
APMC Scrutiny Sweep: 33 Applications Rejected Leaving 267 Candidates in Shirur Fray
Amravati MLC Election Drama
Marathi News Esakal
www.esakal.com