रस्ता सुरक्षा अभियानाची विविध उपक्रमांनी सांगता

रस्ता सुरक्षा अभियानाची विविध उपक्रमांनी सांगता

Published on

सोमाटणे, ता.३१ ः महामार्ग पोलिसांच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाची विविध उपक्रमांनी आज (ता. ३१) सांगता झाली. या अभियानाची सुरवात एक जानेवारीला झाली होती. वडगाव मावळ विभागातील महामार्ग पोलिसांच्या वतीने पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, पुणे-मुंबई महामार्ग व कोलाड महामार्ग व लगतच्या शाळा, कारखाने आदी ठिकाणी हे अभियान राबवण्यात आले. या अभियानाअंतर्गत द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे वाहनचालकांना वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन, वेग नियंत्रणाचे महत्त्व, वाहनांची नियमित तपासणी करणे, वाहनचालक-वाहक यांची ठराविक अंतरानंतर विश्रांती, आरोग्य तपासणी, चांगल्या आरोग्यासाठी आहार विहाराचे महत्त्व, नेत्र तपासणी, लेनची शिस्त, सिट बेल्टचे महत्त्व आदी विषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उर्से येथील पद्मावती विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची रस्त्यालगतच्या गावातून जनजागरण फेरी आदी उपक्रम राबवण्यात आले. उर्से येथील के. के. नाग प्रा. लि.,पौड येथील फ्लोरोसीस प्रा. लि. या कंपन्यांतील कामगार, वाहनचालक यांना वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. रस्त्यालगतच्या गावातील नागरिकांना मोबाईलचा गैरवापर, हेल्मेटची गरज, व्यसनमुक्ती, वेग मर्यादा, ओव्हरटेक करताना काळजी घेणे, सुचाना फलकांचे पालन, वाहतूक नियमाचे पालन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद पवार यांनी दिली.

PNE26V91298

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com