सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

गाजावाजा मोठा, विकासाची गुणवता शून्य

महापालिकेने पुणे ग्रॅन्ड टूर चॅलेंज सायकल स्पर्धेमुळे शहरात विकास आणि सुशोभीकरणाची कामे केली. काही नवनवीन कामे झाली. याचाच एक भाग म्हणून इंद्रायणी चौकात सुशोभीकरणाचे फलक लावण्यात आले. परंतु या फलकांचा उद्देश, गुणवत्ता केवळ आठ दिवसांत दिसून आली. नागरिकांनी करापोटी भरलेल्या निधीची उधळपट्टी करण्यासाठीच ही कामे केली जात असावीत असे म्हणावे लागेल. देश विदेशातील स्पर्धकांना दाखविण्यासाठीच तात्पुरती कामे केल्याचे दिसते. ही कामे करणारे अधिकारी ज्ञानी आहेत की अज्ञानी असा प्रश्न पडतो. कर्तव्याची जाणीव नसलेल्या आणि गुणवत्ताहीन कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर महापालिकेने प्रशासकीय कारवाई केलीच पाहिजे.
- बी. एस. पाटील संभाजीनगर
: PNE26V91413

वाकड येथील दत्त मंदिर मार्गावर पोस्टल कॉलनीत वेलनेस मेडिकलसमोर व्हॉल्वमधून अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ती अशा प्रकारे वाया घालविणे गंभीर बाब आहे. दुसरीकडे महापालिका अनेक सोसायट्यांत पुरेसे पाणी देऊ शकत नाहीत. अनेक ठिकाणी पाणीटंचाई आहे. पाणी गळती थांबविण्याबाबत प्रशासनाचे लक्ष नाही. पाणी वाया असल्याने यास्तव नागरिक त्रस्त आहेत. तरी पाणी गळती महापालिकेने थांबवावी.
- दिलीप बाफना, वाकड

PNE26V91414

चिंचवडगाव ते चिंचवड स्टेशन जुनी एल्प्रो कंपनीसमोरील वस्तीजवळ लाइट डीपी बॉक्स आहे. त्यावरील झाडाच्या फांद्या वाढल्या आहेत. दुर्घटना होण्या अगोदर का फांद्या कापून काढाव्यात. त्यामुळे शॉर्टसर्किटचा धोका टळेल.
- इंद्रजित चव्हाण, चिंचवडगाव

PNE26V91416

महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी ठिकठिकाणी कचराकुंड्या लावण्यात आल्या. निगडी प्राधिकरणातील संत तुकाराम महाराज उद्यानात या कुंड्या वापराविना पडून आहे. त्यांचा योग्य ठिकाणी वापर करावा.
- सिराज बशीर शेख, प्राधिकरण
PNE26V91417


मोरया गोसावी मंदिर रस्त्यावरील तसेच लगतच्या पदपथावरून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना चालणेही कठीण होत आहे. नो पार्किंग असलेल्या जागेवर दुचाकी, चार चारी रिक्षा वाटेल तशा उभ्या केलेल्या असतात. भाजीपाला व इतर विक्रेते पदपथावर ठाण मांडतात. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. अतिक्रमण विभागाचे पथक येते आणि तात्पुरती कारवाई करून जाते. यावर कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी.
- भालचंद्र परब चिंचवड गाव
PNE26V91418

नवी सांगवीतील कै. बाबूराव घोलप महाविद्यालयाकडे जाताना सुरू होणाऱ्या चौकात महानगरपालिकेने पांढरे रम्बलर पट्टे मारले. वाहनचालकांनी या चौकात येताना वेग कमी करावा, अशा उद्देश होता, मात्र सहा महिन्यांतच रम्बलरचे पट्टे रस्त्याला समांतर झाले आहेत. हे काम दर्जाहीन झाले. त्यामुळे वाहनचालक अतिशय वेगाने येतात. नागरिकांसह विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. येथे कोणत्याही क्षणी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पांढरे रम्बलर पट्टे मारण्याऐवजी गतिरोधक उभारावेत, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE26V91420

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com