आयडीटीआरचा नववा ‘सारथी’ प्रमाणपत्र सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १ ः इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (आयडीटीआर) या संस्थेचा सारथी प्रमाणपत्र वितरण सोहळा शनिवारी (ता. ३१) उत्साहात झाला. या कार्यक्रमास ब्रिजस्टोन कंपनीचे प्रशिक्षण विभाग प्रमुख गुसिंग सुदर्शन, ऑल इंडिया टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तर्फे इंडियन टायर टेक्नॉलॉजी ॲडवाईझर कमिटीचे
उपसंचालक विनय विजयवारडिया, पोलिस निरीक्षक दीपक साळुंखे, व्हायटल स्ट्रॅटेजी (ब्लूमबर्ग फिलॉ ट्रॉफी संस्थेचे) सौरभ सोनवणे, आयडीटीआरचे प्राचार्य संजय ससाने उपस्थित होते.
देशातील अवजड वाहन चालकांची वाढती गरज आणि रस्ते अपघातांचे प्रमाण लक्षात घेता कुशल चालक व प्रशिक्षक घडवणे हे आयडीटीआरचे मुख्य उद्दिष्ट आहे. याच उद्दिष्टाला बळ देण्यासाठी ब्रिजस्टोन टायर कंपनीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत चालक प्रशिक्षणासाठी सामाजिक बांधिलकीचा निधी प्रदान केला आहे. या माध्यमातून चालू आर्थिक वर्षात ३५० अवजड वाहन चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत नवव्या तुकडीमधील २७ प्रशिक्षणार्थी चालकांनी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थी चालकांनी आपल्या अनुभव कथनात वाहतूक नियम व चिन्हे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, वाहन अग्निसुरक्षा, माल भरण्याची काळजी, वाहन दुरुस्ती, घाट प्रशिक्षण तसेच प्रथमोपचार अशा विविध विषयांवर मिळालेल्या सखोल प्रशिक्षणाची माहिती दिली.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

