

(मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स ॲड कॉम्प्युटर स्टडीज)
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे निगडीतील मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजमधील बीबीए, बीसीए, बीए, बीकॉम, एमकॉम वर्गातील विद्यार्थ्यांची पालक-शिक्षक सभा उत्साहात झाली. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश दीक्षित प्रमुख पाहुणे होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी पालक व शिक्षक यांच्यात सातत्याने संवाद असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. मनोज साठे यांनी महाविद्यालयात होणारे विविध कार्यक्रम व उपक्रमाची माहिती, विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती, शिक्षकांची ओळख, स्वतःचा शिक्षण क्षेत्रातला अनुभव, याची माहिती दिली. प्रा. रवीकिरण काकडे यांनी पालक सभेचे संयोजन केले. आयक्यूएसी समन्वयक प्रा. धन्वंतरी नरवडे यांनी सूत्रसंचालन केले.
(91637)
राष्ट्रीय कार्यशाळा; ई-पोस्टर स्पर्धा
(मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, मोशी)
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मोशीतील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘कॉम्प्युटेशनल स्ट्रेटेजिस इन ड्रग्स डिझाइन फ्रॉम डॉकिंग टु नेटवर्क फार्माकोलॉजी’ विषयावर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळा व ई-पोस्टर स्पर्धा झाली. त्यात आधुनिक औषध संशोधनामध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धती व औषध डिझाइनमधील उपयोग यावर भर दिला. डॉ. संदेश लोढा (मालिबा फार्मसी कॉलेज, उका तर्साडिया विद्यापीठ, गुजरात), डॉ. श्रीकांत निलेकर (मालिबा फार्मसी कॉलेज, उका तर्साडिया विद्यापीठ, गुजरात) आणि डॉ. सोमदत्त चौधरी (मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, निगडी) यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत १७० तर ई-पोस्टर स्पर्धेत ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनातील नव्या संकल्पना समजून घेण्याची संधी मिळाली. प्रा. डॉ. जी. आर. एकबोटे (अध्यक्ष, बिझनेस कौन्सिल, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणे) यांनी मार्गदर्शन केले. डॉ. एस. एन. ढोले (प्राचार्य, मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, मोशी) यांनी नेतृत्व केले. प्रा. डॉ. व्ही. एस. तांबे व डॉ. आर. एल. म्हेत्रे यांचे सहकार्य लाभले.
राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर
मोशीतील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसीतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष शिबिर उत्साहात झाले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधीलकी, आरोग्य जनजागृती, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणणे हा शिबिराचा उद्देश होता. स्वच्छता अभियान, कचरा व्यवस्थापन, आरोग्य जनजागृती व वैद्यकीय तपासणी, आहार व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन कार्यक्रम राबविले. शिबिराचे उद्घाटन डॉ. श्रीकांत पिंगळे (सल्लागार प्लास्टिक सर्जन, वायसीएम हॉस्पिटल) यांच्या हस्ते झाले. आरोग्याची काळजी, स्वच्छता, भाजल्यानंतर घ्यायची काळजी, प्राथमिक उपचार याबाबत मार्गदर्शन केले. रक्त, रक्तदाब, रक्तशर्कर, रक्तगट तपासणी केली. आरोग्यविषयक जागरूकता केली. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षण फेरी काढली. रस्ता सुरक्षा व सायबर सुरक्षा विषयांवर मार्गदर्शन केले. विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रम झाले. ग्रामस्वच्छता, जलसंवर्धन व सामाजिक विकास या विषयांवर प्रबोधनपर व्याख्याने झाली. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले. प्राचार्य डॉ. एस. एन. ढोले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम अधिकारी रेखा भालेराव यांनी संयोजन केले. प्रवीण पाटोळे, गणेश कदम, नवनाथ वाळके, केशव घनवट व पंकज झेंडे यांचे सहकार्य लाभले.
(91636)
संशोधन पद्धती कार्यशाळा उत्साहात
(यशस्वी आयआयएमएस)
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या (आयआयएमएस) चिंचवड येथील संकुलात आयोजित संशोधन पद्धती कार्यशाळा उत्साहात झाली. यात ‘प्रबंध लेखनासह डेटा विश्लेषण साधनांचे एकत्रीकरण’ ही कार्यशाळेची संकल्पना होती. संशोधन करताना सांख्यिकीय विश्लेषणाचे महत्त्व लक्षात घेऊन संशोधन प्रवासात कठोर आणि नैतिक दृष्टिकोनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे मत आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले. संशोधन क्षमता मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले. सांख्यिकीय साधनांचा वापर करून डेटा विश्लेषण, साहित्य पुनरावलोकन तसेच संदर्भ आणि उद्धरणांसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा वापर नेमका कसा करावा, याशिवाय प्रबंध लेखन आणि प्रकाशनांमध्ये विश्लेषणाचे एकत्रीकरण या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. भारती विद्यापीठाच्या आयटीसी विभागाचे संचालक प्रा. डॉ. सचिन कदम यांनी, शैक्षणिक, वास्तविक-जगातील अनुप्रयोग, उद्योगातील संशोधनाचे महत्त्व स्पष्ट करून देत संशोधक विद्यार्थ्याने वर्णनात्मक आणि अनुमानात्मक डेटा विश्लेषणातील प्रत्यक्ष प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करायला हवे, असे सांगितले. आर सॉफ्टवेअरचा प्रभावी वापर गृहीतक चाचणी व विश्लेषण इत्यादी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. आशुतोष झुंजूर यांनी ‘संशोधन प्रकरणाचा समारोप आणि प्रबंध तयारी’ या विषयावर मार्गदर्शन केले. इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या डॉ. दर्शना देसाई यांनी ‘प्रभावी साहित्य समीक्षा’ विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी व संशोधकांना प्रमाणपत्र प्रदान केले. डॉ. वंदना मोहंती (आयक्यूएसी समन्वयक आणि प्रमुख-एमबीए), डॉ. अश्विनी ब्रह्मे (प्रमुख-एमसीए, कार्यशाळा समन्वयक), डॉ. सचिन मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पद्धती कार्यशाळा यशस्वी झाली.
(91638)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.