पुणे जिल्हा औद्योगिक संघटनांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली

पुणे जिल्हा औद्योगिक संघटनांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली

Published on

पिंपरी, ता. १ : पुणे जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेला ‘फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज’, पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटना, तळेगाव, मरकळ, हिंजवडी, ‘रांजणगाव इंडस्ट्रीज असोसिएशन’ तसेच ‘पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन’च्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
सायन्स पार्कचे संचालक व निवृत्त अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे यांनी पवार यांचे शहराच्या विकासातील योगदान विशद केले. वैज्ञानिक दृष्टिकोनातून निर्णय घेणारा नेता म्हणून पवार यांनी ‘ग्रेड सेपरेटर’, पाणीपुरवठ्यातील ‘स्काडा सिस्टीम’ यांसारख्या प्रकल्पांना चालना दिली, असे त्यांनी नमूद केले.
‘हिंजवडी इंडस्ट्री असोसिएशन’चे राजेश पाटकर यांनी पवार यांच्या कामाची धडाडी व विकासात्मक विचारसरणी पुढे नेण्याची गरज व्यक्त केली. ‘पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन’चे अनिल गालिंदे यांनी त्यांच्या शिस्तप्रियतेचा उल्लेख केला. यावेळी गोविंद पानसरे, आर. डी. चौधरी, दिलीप बटवाल, संदीप बेलसरे, जयंत कड आदींनी भावना व्यक्त केल्या. शोकसभेच्या शेवटी सर्व उपस्थितांनी स्तब्धता पाळून पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com