गजानन प्रकटदिन साजरा

गजानन प्रकटदिन साजरा

Published on

‘गण गण गणात बोते’चा घोष

शहरात गजानन प्रगटदिन उत्साहात; वातावरण भक्तिमय

पिंपरी, ता. ८ ः शेगावच्या धर्तीवर शहरात श्री गजानन महाराज यांचा १४८ वा प्रगटदिन सोहळा अतिशय उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. या पावन दिनानिमित्त ‘गण गण गणात बोते’च्या गजराने वातावरण भक्तिमय झाले होते. मंदिरात पहाटे दुग्धाभिषेक, विशेष पूजा, ग्रंथपारायण, भजन आणि महाप्रसाद वाटप करण्यात आले. प्रकट दिनी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने दुमदुमले आहे.
शहरातील प्रगटदिन उत्सवानिमित्त श्रींच्या आळंदी, जुनी सांगवी, चिंचवड- तानाजीनगर, रावेत, दिघी आदी मंदिरात सप्ताहभर भजन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंदिर परिसराची आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून, फुलांच्या माळा, आंब्यांच्या पानांची तोरणे व केळीचे खांब लावून सजावट करण्यात आली. विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी मंदिर परिसर दिव्यांच्या रोषणाने उजळून निघाला आहे. भाविक आपापल्या परीने मंदिर परिसरात सेवा करत आहेत. काहींनी पालखी सजवली आहे. काहींनी ढोलताशा वाजवून आणि लेझीम खेळून वातावरणात ऊर्जा निर्माण करण्याचा काम केले आहे. तर, काहींनी रांगोळी काढून परिसर सजवला होता.


गजानन महाराजांची पालखी
श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज मंदिरापासून गजानन महाराजांची पालखी निघाली. त्यानंतर प्राधिकरणातून परत मंदिरात आली. यंदाच्या सोहळ्यासाठी दिंड्या दाखल झाल्या. कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. अत्यंत भक्तिभावात महिलांचा लेझीम खेळ व वारकऱ्यांचा भक्ती दिंडी व असंख्य महिला व पुरुष अत्यंत उत्साहाने दिवाळीच्या सणासारखे नटून-थटून मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर आरती झाल्यावर महाप्रसादांचा आस्वाद ५० हजार भाविकांनी घेतला.

‘गण गण गणात बोते’चा जयघोष
भाविक ‘गण गण गणात बोते’चा जयघोष करत मंदिर परिसरात दर्शन घेत होते. मंत्राचा अखंड जप केला गेला. वाहतूक नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था आणि महाप्रसाद वाटपाचीही उत्तम व्यवस्था संस्थाकडून केली आहे. या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त शेगावच्या श्री गजानन महाराज समाधी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम राबवले जात आहेत. अभिषेक, पालखी सोहळा, भजन-कीर्तन, सामुदायिक पारायण आरती आणि मंत्रघोष यांचा समावेश आहे. आजही दर्शन रात्रभर सुरू राहणार आहे.

नैवेद्य दाखवून त्यांना स्मरण
शहरात अनेक ठिकाणी काल्याचे कीर्तन, पालखी काढण्यात आली होती. महाराजांना प्रिय असणारा पिठलं-भाकरी, झुणका, अंबाडीची भाजी आणि मुळ्याच्या शेंगा असा नैवेद्य दाखवून त्यांना स्मरण करण्‍यात आले. उत्सव काळात दररोज सकाळी काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ आणि रात्री कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com