भात पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना धडे

भात पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना धडे

पवनानगर ता. ३० : खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांच्या शेतावर मशागतीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मावळ तालुका कृषी विभागाच्या वतीने पवनमावळ भागात गावोगावी भात पिक पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करण्यासंदर्भात मोहीम राबविली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मळवंडी ठुले खरीप हंगाम मार्गदर्शन सभा घेण्यात आली. गावातील शेतकऱ्यांनी सभेला चांगला प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांना भातपिकाबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषी अधिकारी दत्तात्रेय गावडे व कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी केले.

घरगुती भात बियाणे पेरणीसाठी शेतकरी वापरतात. त्यांनी मिठाच्या ३ टक्के द्रावणाची बीजप्रक्रिया करावी, त्यासाठी दहा लिटर पाण्यात तीनशे ग्रॅम मिठाचा वापर करावा. यानंतर प्रथम शेतकऱ्यांनी रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करुन ३ ते ४ तासानी ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळणारे जीवाणू (पीएसबी) या जीवाणू खताची बीजप्रक्रिया करावी व नंतर अशा पद्धतीने संस्करण केलेले बियाणे हे गादीवाफा तयार करुन रोपवाटिकेवर पेरावे, असे आवाहन गावडे आणि गोसावी यानी केले आहे.
मळवंडी ठुले येथील खरीप हंगाम सभेस उपसरपंच ज्ञानेश्वर तुकाराम ठुले, ग्रामपंचायत सदस्य वसंत ठुले, प्रगतशील शेतकरी किसन ठुले, ज्ञानेश्वर बेनगुडे, एकनाथ राक्षे, बबन पवार, शाबू ठुले, आबू ठुले, भगवान ठुले, प्रदीप देशपांडे, वसंत पवार, यशवंत बेनगुडे, ज्ञानेश्वर ठुले, अंकुश ठुले, बाळू पवार, बाबुराव उदेकर, अंनता बेनगुडे, संतोष ठुले, संजय आमले, गोरखनाथ शिंदे, रामदास ठुले भाऊ मोहोळ, बाळू पवार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कृषीसहायक विकास गोसावी व प्रदीप देशपांडे यांनी केले.

बीजप्रक्रियेचे फायदे
- जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो
- बियाण्यांची उगवणक्षमता वाढते
- रोपे तजेलदार व जोमदारपणे वाढतात
- पिकाच्या उत्पादनात वाढ होते
* बीजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो.


‘‘खरीप हंगाम मार्गदर्शन सभेचा आमच्या गावातील शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. आम्ही सर्व शेतकरी बीजप्रक्रिया, गादीवाफ्यावर रोपवाटिका, दोरीत लागवड, युरिया ब्रिकेट खताचा वापर करणार आहोत. कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी कायमच कार्यरत आहे.
- प्रदीप देशपांडे, प्रगतशील शेतकरी, मळवंडी ठुले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com