संत तुकाराम कारखान्यामुळे शेतकरी सधन

संत तुकाराम कारखान्यामुळे शेतकरी सधन

शिरगाव ता. ३ ः ‘‘श्री संत तुकाराम कारखान्याच्या माध्यमातून मावळ, मुळशी येथील शेतकरी सधन झाला’’, असे गौरवोद्‍गार मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी काढले.
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन व २६ व्या गळीत हंगामाचे उद्‍घाटन करताना बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शांतीब्रम्ह मारोती महाराज कुऱ्हेकर, संतोष महाराज पायगुडे, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, विलास लांडे, शरद ढमाले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, शंकर शेलार, चंद्रकांत सातकर, बबनराव भेगडे, बाबुराव वायकर, संतोष मुऱ्हे, एकनाथ टिळे, ज्ञानेश्वर दळवी, दत्ता गुंड, रवी भेगडे, गुलाब म्हाळस्कर, राजाभाऊ हगवणे, सविता दगडे आदींसह कारखान्याचे कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारणे यांनी श्री संत तुकाराम कारखान्यामुळे परिसरातील जमिनी व्यावसायिकांच्या घशात जाण्यापासून वाचल्या म्हणून आज येथील शेतकरी शेती करताहेत, असेही नमूद केले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार विलास लांडे यांनी कारखाना नानांच्या नेतृत्वात उत्तम कामगिरी करत असून सर्वपक्षीय संचालक मंडळाच्या माध्यमातून प्रगती करत आहे, असे म्हटले. नवले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी व कारखान्याच्या कामगारांच्यावतीने, भंडारा डोंगर येथील संत तुकाराम महाराज मंदिरासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपयांची देणगी देण्यात आली. कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी कारखान्याची उभारणी, सहवीज प्रकल्प ते इथेनॉल प्रकल्प उभारणीचा प्रास्ताविकात आढावा घेतला. कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेबराव पठारे यांनी स्वागत केले. संचालक अनिल लोखंडे यांनी आभार मानले. यावेळी कारखान्याचे संचालक तुकाराम विनोदे, संचालक चेतन भुजबळ, तुळशीदास घोलप, दिलीप दगडे, सुभाष राक्षे, शामराव राक्षे, बाळकृष्ण कोळेकर, शिवाजी पवार, बाळासाहेब बावकर, अंकुश उभे, मधुकर भोंडवे, महादेव दुडे, दिनेश मोहिते, प्रविण काळजे, नरेंद्र ठाकर, सखाराम गायकवाड, संचालिका शुभांगी गायकवाड, ताराबाई सोनवणे, तज्ञ संचालक ॲड.ज्ञानेश नवले, सुभाष जाधव, प्रभारी सचिव मोहन काळोखे आदींनी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com