murder
murdersakal

Talegaon Dabhade Crime : सुपरवायझरचा कामगाराकडून खून; दोघे अटकेत

काम सांगत असल्याचा राग मनात ठेवून कामगार व त्याच्या अल्पवयीन साथीदाराने सुपरवायझरचा खून केल्याची घटना नुकतीच घडली.

तळेगाव दाभाडे - काम सांगत असल्याचा राग मनात ठेवून कामगार व त्याच्या अल्पवयीन साथीदाराने दुचाकीवरून पाठलाग करुन सुपरवायझरचा स्टील पाईप डोक्यात मारुन खून केल्याची घटना नुकतीच घडली. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

बेबड ओहोळ-शिवणे रस्त्यावरील माने ॲग्रोजवळ सायंकाळी ५.३० वाजता हा प्रकार घडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुधीर मच्छिंद्र अडसूळ (वय-४७, रा. बेबड ओहोळ, ता. मावळ, मूळगाव परभणी) असे खून झालेल्या सुपरवायझरचे नाव आहे.आरोपी कुमार भगवान ओझरकर (वय-२७, रा. शिवणे, ता. मावळ, जि. पुणे) व त्याचा अल्पवयीन साथीदाराला खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली आहे.

शिरगाव-परंदवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुपरवायझर सुधीर अडसूळ व आरोपी कुमार ओझरकर हे माने ऍग्रोमध्ये कामाला होते. सुपरवायझर अडसूळ हे आरोपी ओझरकर याला कंपनीत काम सांगत होते. त्याचा राग आरोपी कुमार ओझरकर याला राहत होता.

अडसूळ हे दुचाकीवरून घरी जात असताना आरोपी ओझरकर व त्याचा साथीदार याने पाठलाग करून स्टील पाईपने त्यांचा खून केला. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून दोघे आरोपी फरार झाले. शिरगाव-परंदवडी पोलिसांनी धाव घेऊन अडसूळ यांना सोमाटणे फाट्यावरील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान बुधवारी (ता. २०) सायंकाळी ५ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पारखे अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com