फास्ट फूड, ऑनलाइन ऑर्डरींमुळे 
वाढतोय कर्करोगाचा धोका

फास्ट फूड, ऑनलाइन ऑर्डरींमुळे वाढतोय कर्करोगाचा धोका

Published on

तळेगाव दाभाडे, ता. २ ः तरुणांमध्ये वाढत चाललेली फास्ट फूडची सवय आणि ऑनलाइन फूड ऑर्डरींच्या वाढत्या वापरामुळे भविष्यात कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे जंक फूडचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढले असून, हे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत आहे.
तज्ज्ञांच्या मते, फास्ट फूडमध्ये मीठ, साखर, ट्रान्स-फॅट तसेच विविध प्रोसेस्ड घटकांचे प्रमाण अधिक असते. हे घटक शरीरात दाह निर्माण करतात आणि पेशींमध्ये अपायकारक बदल घडवून आणतात. सातत्याने जंक फूडचे सेवन केल्यास लठ्ठपणा, हार्मोनल असंतुलन आणि मेटाबॉलिक सिंड्रोमसारख्या समस्या वाढतात. या समस्या स्तन, कोलन तसेच यकृताच्या कर्करोगाशी संबंधित असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
याशिवाय, ऑनलाइन फूड डिलिव्हरीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक पॅकेजिंगमधील पीएफएएस, बीपीए यांसारखी रसायने गरम अन्नात मिसळण्याची शक्यता असते. दीर्घकाळ या रसायनांच्या संपर्कात आल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
तळेगाव दाभाडे येथील टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरचे डॉ. गौरव जसवाल यांनी सांगितले की, ‘‘घरचे ताजे व सकस अन्न, फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. जंक फूड टाळणे, नियमित व्यायाम करणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे या सवयी अंगीकारल्यास कर्करोगासह इतर अनेक आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.’’
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com