काळ्या काचांच्या वाहनांवर 
तळेगावमध्ये धडक कारवाई

काळ्या काचांच्या वाहनांवर तळेगावमध्ये धडक कारवाई

तळेगाव स्टेशन, ता. १६ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या आदेशानुसार नऊ जानेवारी १६ जानेवारी दरम्यान वाहतूक विभागाने काळ्या काचा आणि फॅन्सी नंबरप्लेट वर धडक कारवाई करीत तब्बल पावणेदोन लाख रुपयांपेक्षा अधिक दंड बेशिस्त वाहनचालकांना ठोठावला आहे.
तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाने गेल्या आठवडाभरात विविध ठिकाणी केलेल्या तपासणीत जवळपास सव्वादोनशे वाहनांवर कारवाई केली. कायद्याने बंदी असलेल्या वाहनांच्या फिल्म लावलेल्या काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेट आदींबाबत नियमांचे पहिल्यांदा उल्लंघन करताना आढळल्यास पाचशे रुपये तर दुसऱ्यांदा आढळल्यास पंधराशे रुपये दंडाची तरतूद आहे. त्यानुसार फिल्म लावून काळ्या काचा केलेल्या १६८ वाहनांवर कारवाई करीत एक लाख ५९ हजार रुपये ऑनलाइन दंड ठोठावला. छोट्या आकाराचे आकडे तसेच वैध नसलेल्या फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या ४९ वाहनांवर कारवाई करीत ३४ हजार पाचशे रुपये असा एक लाख ९३ हजार पाचशे रुपये ऑनलाइन दंड ठोठावला. या कारवाईत एकूण दंड रकमेपैकी जवळपास २५ टक्के रक्कम जागेवर ऑनलाइन पद्धतीने वसूल करण्यात आली. पकडलेल्या वाहनांच्या दंड वसुलीनंतर काचांवर चिकटविलेल्या काळ्या फिल्म वाहतूक पोलिसांनी फाडल्यामुळे बेशिस्त वाहनचालक धास्तावले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com