अपघातात सांडलेल्या डांबरामुळे रहिवासी त्रस्त

अपघातात सांडलेल्या डांबरामुळे रहिवासी त्रस्त

तळेगाव स्टेशन, ता. १७ : अपघातग्रस्त ट्रक आणि बस तब्बल तीन दिवसांनी अपघातस्थळावरुन हटविण्यात आले. मात्र, ट्रकमधील पिंपातून सांडलेले डांबर उन्हामुळे वितळून आजूबाजूला पसरल्याने सक्सेस चेंबर्स हाउसिंग सोसायटीमधील रहिवासी आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. तळेगाव-चाकण महामार्गावर रविवारी (ता. १४) पहाटे सेवाधाम हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर उलटला होता. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला होता. अपघातानंतर ट्रकमधील पिंप एका बसवर आणि रस्त्यावर फेकले गेले. पिंपातील डांबर खाली ओघळून इमारतीच्या तळमजल्यापर्यंत पसरले. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रक, बस आणि डांबराचे पिंप जागेवरच पडून होते, ते मंगळवारी (ता. १५) रात्री हटविण्यात आले. मात्र, जमिनीवर सांडलेले डांबर वितळल्याने उचलता आलेले नाही. तळेगाव नगरपरिषद प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा करूनही डांबर साफ न केल्यामुळे ते आणखी पसरत चालले आहे. त्यामुळे हे डांबर आजूबाजूच्या नागरिकांच्या पादत्राणांना आणि वाहनांच्या चाकांना चिकटत आहे. तसेच या डांबरामुळे अपघाताची शक्यता आहे. पोलिस आणि नगरपरिषद प्रशासनाकडून संयुक्त मोहीम राबवून डांबर त्वरित साफ करण्याची नागरिकांची मागणी आहे.

डांबर हे केंद्र शासनाच्या अखत्यारितचा माल असल्याने पोलिस प्रशासनाकडून रीतसर परवानगी आल्यानंतरच हे डांबर उचलता येऊ शकेल.
- एन. के. पाटील, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com