प्राथमिक शिक्षक पतसंस्थेसाठी
मावळात ९८ टक्के मतदान

प्राथमिक शिक्षक पतसंस्थेसाठी मावळात ९८ टक्के मतदान

वडगाव मावळ, ता. ५ : मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी उत्साहात सुमारे ९८ टक्के मतदान झाले. ६५१ सभासदांपैकी ६३६ जणांनी मतदान केले. मतदानाची प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली.
प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या संचालक मंडळाची मुदत दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाली होती. परंतु कोरोनामुळे निवडणूक झाली नव्हती. सुमारे सात वर्षानंतर निवडणूक होत असल्यामुळे शिक्षकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. पतसंस्थेची सभासद संख्या ६५१ असून निवडणुकीत लोकशाही स्वाभिमानी सहकार पॅनेल, भक्ती शक्ती पॅनेल व संघशक्ती परिवर्तन पॅनेल अशी तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात होती. संचालकांच्या एकूण १९ जागांसाठी ५५ उमेदवार रिंगणात होते. त्यात सर्वसाधारण १४ जागांसाठी ४१, महिलांच्या दोन जागांसाठी सहा, इतर मागास वर्गाच्या एका जागेसाठी तीन, अनुसूचित जाती - जमातीच्या एका जागेसाठी तीन व भटक्या जमातीच्या एका जागेसाठी दोन उमेदवारांचा समावेश आहे. भक्ती शक्ती व लोकशाही पॅनेलने सर्वच्या सर्व १९ तर संघशक्ती परिवर्तन पॅनेलने १५ जागांवर उमेदवार उभे केले होते. तर दोन अपक्ष उमेदवारही नशीब अजमावत आहेत. सकाळी नऊ वाजता पतसंस्थेच्या कार्यालयात मतदानाला सुरुवात झाली. तीन पॅनेलमध्ये चुरस असल्याने मतदान केंद्राबाहेर सकाळपासून शिक्षकांची मोठी गर्दी झाली होती. तिन्ही पॅनेलने बूथ उभारले होते. सर्व उमेदवार हात जोडून रांगेत उभे राहून मतदारांना मत देण्याचे आवाहन करत होते. उमेदवारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ६५१ मतदारापैकी ६३६ मतदारांनी (९८ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडल्याची माहिती निवडणूक अधिकारी विनोद कोतकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com