उपनगराध्यक्षांकडून बाजारात 
शंभर टक्के कराची वसुली

उपनगराध्यक्षांकडून बाजारात शंभर टक्के कराची वसुली

वडगाव मावळ, ता. १३ ः येथील आठवडे बाजारात स्वतः फिरून वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सायली रूपेश म्हाळसकर यांनी शंभर टक्के कर वसुली केली. दरवेळेपेक्षा पन्नास टक्के अधिक कर वसूल करून, त्यांनी कर्मचाऱ्यांपुढे धडा घालून दिला.
वडगाव शहरात दर गुरुवारी आठवडा बाजार भरतो. हा बाजार संपूर्ण मावळ तालुक्यात प्रसिद्ध असल्याने अनेक शेतकरी व व्यापारी आपला शेतमाल तसेच किरकोळ वस्तू विक्रीसाठी बाजारात आणतात. त्या खरेदी करण्यासाठी शहर व पंचक्रोशीतून महिला व नागरिक मोठी गर्दी करतात. नगरपंचायतीच्यावतीने आठवडा बाजारातील प्रत्येक विक्रेत्याकडून स्वच्छता व आरोग्य कर तसेच जागा भाडे म्हणून कर आकारला जातो. मात्र तो कर पूर्णपणे वसूल होतो का किंवा वसूल झालेला कर कर्मचाऱ्यांकडून नगरपंचायतीकडे जमा केला जातो का याची खातर-जमा करण्यासाठी व त्यातील पारदर्शकता पाहण्यासाठी वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी स्वतः आठवडा बाजारात जाऊन भाजीपाला विक्रेत्यांकडून कर आकारणी केली. एरवी आठवडे बाजारातून नगरपंचायतीला फक्त पन्नास टक्के महसूल जमा होत असतो. म्हाळसकर यांच्या या निर्णयामुळे शंभर टक्के महसूल जमा झाला. नगरपंचायत कर्मचारी शंकर ढोरे, रवी साबळे, प्रदीप तुमकर, रमेश कचरे आदी उपस्थित होते.

फोटो ः 05561,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com