Pune-Mumbai Expressway
Pune-Mumbai Expresswayesakal

Pune-Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सेवा रस्ते करा, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

सेवा रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थ महामार्गाचा वापर करत आहे. त्यामध्ये, अनेक ग्रामस्थ मृत्युमुखी पडले आहेत

वडगाव मावळ, ता.२७ : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते करण्याची मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासून मागणी असून त्याबाबत कार्यवाही करावी, असे पत्र मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना पाठविले आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला गहुंजे ते कुसगाव (लोणावळा) पर्यंत महामार्गाच्या हद्दीतून सेवा रस्ते करावेत. द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादित केलेल्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना महामार्गावर नोकरी, उद्योग, व्यवसायात प्राधान्य द्यावे, आदी मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुभाष धामणकर व त्यांचे सहकारी गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. परंतु, अद्यापही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सेवा रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थ महामार्गाचा वापर करत आहे. त्यामध्ये, अनेक ग्रामस्थ मृत्युमुखी पडले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. द्रुतगती महामार्गालगत सेवा रस्ता झाल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊन ग्रामस्थ महामार्गाचा वापर करणे टाळतील.

याबाबत रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व ग्रामस्थांची ५ ऑक्टोबर २०२३ रोजी तहसिल कार्यालयात समन्वय बैठक झाली होती. या बैठकीमध्ये सेवा रस्ता करण्याबाबत एकमताने ठरले. त्यानुसार, अधिकारी व ग्रामस्थ यांनी एकत्रित पहाणी आणि सर्वेक्षणही केले होते. मात्र, आजतागायत कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे, संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com