थेरगाव मंडलाकडून
१५० दाखल्यांचे वाटप
एकाच दिवसात, एकाच छताखाली वितरण

थेरगाव मंडलाकडून १५० दाखल्यांचे वाटप एकाच दिवसात, एकाच छताखाली वितरण

हिंजवडी, ता. ६ : मुळशी तालुका तहसील कार्यालयातंर्गत थेरगाव मंडल कार्यालयाच्यावतीने विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना झटपट घेता यावा म्हणून एकाच छताखाली, एकाच दिवशी आवश्यक असलेले दाखले मिळावेत, यासाठी विशेष दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले होते. त्यास उस्फूर्त प्रतिसाद लाभला. १५० नागरिकांना विविध दाखल्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले.
मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले व मंडल अधिकारी हेमंत नाईकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर झाले. थेरगाव, जांबे, हिंजवडी, माण, मारूंजी, नेरे, कासारसाई या गावातील सुमारे १५० नागरिकांना विविध उत्पन्न दाखले वितरित करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेतील विधवा, परितक्त्या, घटस्फोटित, अंध, अपंग यांना तसेच विवाह प्रोत्साहन, श्रावण बाळ, राष्ट्रीय कुटुंब कल्याण या विविध योजना, शाळेतील प्रवेश तसेच अनुदान मिळवण्यासाठी उत्पन्नाचे दाखले प्रदान करण्यात आले.
गावनिहाय विभागवार दाखले या वेळी वितरित करण्यात आले होते. तहसीलदार रणजित भोसले या वेळी म्हणाले, ‘‘नागरिकांची सोय व्हावी, यासाठी अशा प्रकारे शिबिर घेण्यात येत असते. यासाठी अनेक दिवस आधीपासून नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. त्यास भरघोस प्रतिसाद मिळाला. शिबिरात थेरगाव मंडळातील वर्षा वाडेकर, स्नेहल दिवटे, हनुमंत चांदेकर, अशोक आमोदे, संतोष राणे, सागर शेलार व सर्व कोतवाल मंडळी यांनी संयोजन केले

फोटो ः 03791

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com