वाकडमध्ये विविध उपक्रमांनी 
बुद्ध पौर्णिमा साजरी

वाकडमध्ये विविध उपक्रमांनी बुद्ध पौर्णिमा साजरी

वाकड, ता. १३ : येथील लोकनेते अशोक वाघमारे सोशल फाउंडेशनच्या वतीने गरीब, गरजू लहान शाळकरी मुलांसाठी विविध स्पर्धा, सहल, खाऊ वाटप, अन्नदान अन् बक्षिस समारंभ अशा विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.
या आगळ्या-वेगळ्या सामाजिक उपक्रमाने निरागस बालकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे अनोखे हास्य फुलले होते. सर्वप्रथम सकाळी कार्ला येथील बुद्ध लेणीला सहल गेली. लेण्यांची पाहणी करून देहूतील ऐतिहासिक धम्मभूमीतील बुद्ध विहाराला भेट दिली. त्यानंतर वाकड गावठाणातील लोकनेते अशोक वाघमारे बुद्ध विहारात बालचमुंचा ताफा पोहचताच खाऊचा आस्वाद घेऊन लिंबू चमचा, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा झाल्या. यात प्रथम (एक हजार), द्वितीय (पाचशे), तृतीय (तीनशे) व तीन उत्तेजनार्थ विजेत्यांना शालेय साहित्य असे बक्षिसे प्रदान करण्यात आली.
या वेळी लोकनेते अशोक वाघमारे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रूपेश शिंदे, स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचे संघटक किशोर साळवे, वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष विजय वाघमारे, बहुजन समाज पार्टीचे शहर उपाध्यक्ष विशाल वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते मनोज पवार, स्वराज सगट आदी उपस्थित होते. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com