Hanuman Jayanti Yatra
Hanuman Jayanti Yatrasakal

Hanuman Jayanti Yatra : म्हातोबाचं चांगभलं’च्या गजराने आयटीनगरी दुमदुमली !

आयटीनगरी हिंजवडी आणि वाकडचे ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाच्या यात्रेला पंचक्रोशीतील भाविकांची मंगळवारी (ता.२३) अलोट गर्दी उसळली. यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेली बगाड मिरवणूक सायंकाळी मोठ्या उत्साहात काढण्यात आली.

हिंजवडी : आयटीनगरी हिंजवडी आणि वाकडचे ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाच्या यात्रेला पंचक्रोशीतील भाविकांची मंगळवारी (ता.२३) अलोट गर्दी उसळली. यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेली बगाड मिरवणूक सायंकाळी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीत राजकीय पुढाऱ्यांचीही ‘भाऊगर्दी’ पाहायला मिळाली.
हिंजवडी आणि वाकड गावाचे ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाची दरवर्षी चैत्र पौर्णिमा- हनुमान जयंतीला यात्रा भरविली जाते.

यंदा गळकरी म्हणून उमेश दिगंबर जांभुळकर यांची निवड करण्यात आली. तर अतुल साखरे आणि संग्राम साखरे यांना यंदा खांदेकरी होण्याचा बहुमान मिळाला. वाकडहून ग्रामस्थ गळ घेऊन होळीच्या पायथ्याला आल्यानंतर किसन साखरे-पाटील यांनी गळाचा मानकरी पुकारला. खांदेकऱ्यांनी म्हातोबा मंदिरात गळकऱ्याला आणताच त्याला स्नान घालण्यात आले. सुवासिनींनी नवरदेवाप्रमाणे हळदी-कुंकवाचा मळवट भरला.

पारंपरिक देवाचा, फेटा उपरणे, पंचा असे वस्त्र नेसवून मारुतीचे दर्शन करून गळकऱ्याला होळीच्या पायथ्याशी आणले.
होळी पायथ्याला साखरे-पाटील आणि सुतार कुटुंबातील गराडे यांनी मानाप्रमाणे गळकऱ्याला गळ टोचला. गळ टोचल्यानंतर पाणी पाजून मार्गस्थ करून गळकऱ्याला बगाडावर बसविण्यात आले. हुलावळे परिवाराला काठीचा मान असतो. भंडारा-खोबऱ्याची उधळण करत चांगभले, पैस...पैस च्या गजरात पाचच्या सुमारास भूमकर वस्ती, वाकडकर वस्ती, देवकर वस्ती, भुजबळ वस्ती, वाकड गावठाण या मार्गे गाठभेट घेत बगाड मिरवणूक वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिरात पोहोचताच सांगता झाली.

मिरवणुकीत नेतेमंडळींचा सहभाग
यंदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बगाड यात्रेत नेते मंडळी बगाड रथाबरोबर चालल्याचे दिसून आले. त्यामध्ये, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पार्थ पवार यांचा प्रामुख्याने समावेश होता.

आयडी : 15574

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com