पिंपरी चिंचवडमध्ये मृतांचा आकडा वाढतोय; शहरात एकाच दिवसात 23 जणांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 18 August 2020

पिंपरी चिंचवड शहरात आज 681 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 36 हजार 78 झाली आहे. आज 79 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 25 हजार 60 झाली आहे. सध्या 10 हजार 337 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 662 झाली आहे.

पिंपरी : कोरोना संसर्ग झाल्याने शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 23 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात दहा महिला व 13 पुरुषांचा समावेश आहे. एकट्या चिंचवडमधील पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून यात एक महिला व चार पुरुष रुग्ण आहेत. 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी चिंचवड शहरात आज 681 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 36 हजार 78 झाली आहे. आज 79 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 25 हजार 60 झाली आहे. सध्या 10 हजार 337 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 662 झाली आहे.

आज मयत झालेले पुरुष :
चिंचवड (वय 59, 55, 72, 60), निगडी (वय 62), आकुर्डी (वय 53), किवळे (वय 66), मोशी (वय 85, 78), दापोडी (वय 49), च-होली (वय 95), थेरगाव (वय 73), जुनी सांगवी (वय 74) येथील रहिवासी आहे

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मयत झालेल्या महिला : 
भोसरी (वय 62), वाकड (वय 67), चिंचवड (वय 65), पिंपरी (वय 83, 80), निगडी (वय 65), दिघी (वय 39), कासारवाडी (वय 80), दापोडी (वय 74), पिंपळे गुरव (वय 60) येथील रहिवासी आहे

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The total death in the city of Chinchwad is 662 due to corona