Corona Updates: पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या ९६ हजाराच्या उंबरठ्यावर!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 December 2020

आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 745 झाली आहे. तर, शहराबाहेरील 717 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी (ता.25) 111 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 95 हजार 961 झाली आहे. शुक्रवारी 121 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 92 हजार 512 झाली आहे. सध्या एक हजार 704 सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी शहरातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब ठरली. 

IFFI 2020: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'खिसा'ने मारली एन्ट्री!​

आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 745 झाली आहे. तर, शहराबाहेरील 717 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महापालिका रुग्णालयांत 747 रुग्ण उपचार घेत आहेत. 957 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 93 घरांना शुक्रवारी स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात तीन हजार 447 जणांची तपासणी करण्यात आली. शुक्रवारी 698 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 82 हजार 943 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'मी कोल्हापूरला जाणार!'​

शुक्रवारी मृत्यू झालेले शहरातील पुरुष बिजलीनगर (वय 61), काळेवाडी (वय 65) व दिघी (वय 48) येथील रहिवासी आहेत. 

तसेच एक हजार 778 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. दोन हजार 434 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. दिवसभरात रुग्णालयातून एक हजार 789 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 839 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. 

पुणेकरांनो, शाळा पुन्हा सुरू करण्याची 70 टक्के तयारी पूर्ण!

आजपर्यंत पाच लाख 38 हजार 370 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील चार लाख 41 हजार 570 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आजपर्यंत पाच लाख 34 हजार 475 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: total number of corona patients in Pimpri Chinchwad city is 95961