esakal | Video: चंद्रकांत पाटील म्हणाले, 'मी कोल्हापूरला जाणार!'
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant_Patil

"प्रत्येकाला पुण्यात सेटेल व्हावे असेच वाटते,'' असे म्हणताच, सभागृहात उपस्थितींनी मोठ्याने हसत टाळ्या वाजविण्यास सुरूवात केली.

Video: चंद्रकांत पाटील म्हणाले, 'मी कोल्हापूरला जाणार!'

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : कोल्हापूरवरून येऊन पुण्यात कोथरूड विधानसभा मतदारसंघून आमदार झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कायमच विरोधकांचे लक्ष ठरतात. मात्र आता खुद्द चंद्रकांत पाटील यांनीच मी कोल्हापूरला परत जाणार, असे जाहीर कार्यक्रमात स्पष्ट केले. 

संस्कृती प्रतिष्ठान आयोजित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल संस्कृती गौरव पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथील प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, खासदार गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वैशाली माशेलकर, हापौर मुरलीधर मोहोळ, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, सुनील महाजन
आदी यावेळी उपस्थित होते. 

पगार 'लॉक' केल्यामुळं सरकारी वकिलांचं बजेट झालं 'डाउन'!​

गिरीश बापट त्यांच्या भाषणात म्हणाले, "दादा, जगात काही झाले तरी त्याचा संबंध पुणेकर स्वतःशी जोडतात. देवेंद्र फडणवीस यांचे काका पुण्यात असल्याने त्यांचाही संबंध जाेडतात. तसेच डाॅ. माशेलकर हे गोवा, मुंबई इथे राहिले असले तरी ते आता पुणेकरच झाले आहेत, असे सांगितले. 

हाच धागा पकडून चंद्रकांत पाटील बोलत असताना "प्रत्येकाला पुण्यात सेटेल व्हावे असेच वाटते,'' असे म्हणताच, सभागृहात उपस्थितींनी मोठ्याने हसत टाळ्या वाजविण्यास सुरूवात केली. त्याच वेळी "मी पुण्यात राहणार नाही, देवेंद्रजी मी परत कोल्हापूरला जाणार आहे. माझ्या विरोधांना सांगून टाका," असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 

सरळसेवा भरती MPSC मार्फतच करा; जिल्हाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांचं निवेदन​

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी २०१९ मध्ये कोथरूड मतदारसंघून निवडणूक लढवून जिंकली. त्यावेळी पाटील यांच्यावर ते बाहेरचे आहेत असा आरोप केला जातो. पाटील यांनी वेळोवेळी त्यांचा पुण्याशी संबंध कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही पाटील यांना कोल्हापूरवरून आपल्याने वारंवार ट्रोल केले जाते. त्यातच आज पुण्यात "मी कोल्हापूरला परत जाणार" असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image