esakal | मावळात आधीच कोरोनाचं संकट, त्यात पर्यटकांची वर्दळ
sakal

बोलून बातमी शोधा

मावळात आधीच कोरोनाचं संकट, त्यात पर्यटकांची वर्दळ

लॉकडाउनचे नियम धाब्यावर बसवून असंख्य पर्यटकांची वर्दळ नाणे मावळात वाढली आहे.

मावळात आधीच कोरोनाचं संकट, त्यात पर्यटकांची वर्दळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

करंजगाव (ता. मावळ) : लॉकडाउनचे नियम धाब्यावर बसवून असंख्य पर्यटकांची वर्दळ नाणे मावळात वाढली आहे. श्री क्षेत्र कोंडेश्वर व ढाक बहिरी या ठिकाणी जाऊन वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मावळातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कोरोना होणार नाही, अशी भावना अनेकांची झाली आहे. मावळातील धरणांच्या बॅक वॉटरवर तसेच, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांवर अनेक जण एकत्र येत पार्ट्यांचा आनंद घेत आहे. परंतु, सध्या मावळात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पर्यटकांची वाढणारी गर्दी चिंतेचा विषय ठरत आहे. शिरोता, टाटा, वडीवळे आदी धरणांच्या काठावर पार्ट्या रंगत आहे. काही अतिउत्साही तरुण नाणे मावळातील ढाक बहिरीच्या कड्याकडे ट्रेकिंगसाठी आयोजन करत असल्याचे दिसून येते.
 दरम्यान, जांभवली येथील नागरिकांनी पर्यटकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दमबाजीला सामोरे जावे लागत आहे, असे तेथील ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा- Breaking : पिंपरी-चिंचवडमध्ये मृतांचा आकडा वाढला, आज झालेले मृत्यू आतापर्यंतचे सर्वाधिक

नाणे मावळातील महादेवाचे प्रसिद्ध प्राचीन मंदिर

नाणे मावळच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जांभवली गावातून सुमारे दोन किमी जंगल पार करावे लागते. त्यानंतर सह्याद्रीच्या डोंगररांगेतील डोंगरात श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर आहे. मंदिरामागेच पुरातन काळापासून अस्तित्वात असलेली कुंड आहेत. यातूनच कुंडलिका नदीचा उगम झाला आहे. या कुंडात बाराही महिने पाणी असते. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या मावळ भागातील हा भाग जणू महाराष्ट्राचे काश्मीरच आहे. मंदिराचा गाभारा हा शिवपूर्व काळातला असून, मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. यासाठी जांभवलीपासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता तयार केला आहे. त्यामुळे पावसाच्या सरी अंगावर झेलून रोमांच अनुभवण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करीत असतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image