मेट्रोच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीत बदल 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

मेट्रोच्या कामासाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरी ते दापोडी यामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

पिंपरी : मेट्रोच्या कामासाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरी ते दापोडी यामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्याने सेवा रस्त्याने वळविण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संत तुकारामनगर ते हॅरिस ब्रिज मेट्रो स्टेशनच्या वॉटर टॅंक, फूट ओव्हर ब्रिजचे फुटिंग, स्टेअर केस व लिफ्टचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी संत तुकारामनगर ते हॅरिस ब्रिज दरम्यानच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पिंपरीतील किज हॉटेल ते दापोडीतील हॅरिस ब्रिज यादरम्यान महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड कंपनीतर्फे आजपासून (ता. 16) सकाळी अकरा ते सायंकाळी पाच व रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळात काम करण्यात येणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या कामामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सेवा रस्त्याने वळविण्यात येणार आहे. या वेळेत वाहतूक संथ गतीने चालणार आहे. तरी या वाहतूक बदलाबाबत मेट्रोचे कर्मचारी व वाहतूक कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic changes on pimpri to dapodi route for metro work