धक्कादायक : ई-पासचा वापर चक्क 'या' कामासाठी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्याबाहेर जाताना प्रवासासाठी पोलिसांकडून मिळणारा ई-पास गरजेचा आहे.

पिंपरी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्याबाहेर जाताना प्रवासासाठी पोलिसांकडून मिळणारा ई-पास गरजेचा आहे. अत्यावश्‍यक कारणारासाठी पोलिसांकडून हा पास दिला जातो. मात्र, एक जण हा पास लातूरहून पिंपरी-चिंचवडला गांजा विक्रीसाठी आल्याचे समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अल्लाबक्ष नजीर शेख (वय 26, रा. महात्मा गांधी कुष्ठ धाम, सारोळा रोड, जि. लातूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मोटारीतून गांजा विक्रीसाठी एक जण चिंचवडला बुधवारी (ता. 12) दुपारी येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी वाल्हेकरवाडी येथील लक्ष्मीनगर परिसरात सापळा रचून शेख याला मोटारीसह ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच लाख 14 हजार रुपये किमतीचा वीस किलो 595 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. पोलिसांनी गांजा आणि मोटार, असा दहा लाख 15 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 

पर्यटकांनो, लोणावळेकरांचं हे ऐका  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाउन असले, तरी अत्यावश्‍याक कामासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अनेक जण त्याचा गैरवापर करीत असल्याचे समोर येत आहे. शेख याने देखील खोटे कारण सांगून हा पास मिळविला. त्यानंतर लातूरहून थेट पिंपरी-चिंचवडला पोहोचला. दरम्यान, पोलिसांकडून हा पास दिला जात असताना कागदपत्रांच्या तपासणीसह नागरिकांकडून प्रवासासाठी दिल्या जाणाऱ्या कारणांचीही योग्य पडताळणी होणे आवश्‍यक असल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Travel from Latur to Pimpri-Chinchwad via e-pass for sale of cannabis