बापरे! पिंपरी-चिंचवडमधील बारा पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल एवढ्या कोटींचा मुद्देमाल पडून

Pimpri-Chinchwad-Police-Station goods
Pimpri-Chinchwad-Police-Station goods
Updated on

पिंपरी - जप्त केलेला मुद्देमाल तक्रारदाराला लवकर परत मिळणे म्हणजे कठीणच. वाहन अथवा इतर वस्तुसारखा मुद्देमाल पोलिस ठाण्यातच अक्षरशः सडून जातो. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे संबंधित व्यक्तीच्या हाती पडत नाही. अशाच प्रकारे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील १२ पोलिस ठाण्यात सध्या तब्बल २४ कोटी ६१ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल पडून आहे. 

वाहनांचा ढीग 
पोलिस ठाणे म्हटले की गंजलेली, धूळखात पडलेली वाहने दृष्टीस पडतात. गुन्ह्यांमध्ये पोलिस शेकडो वाहने जप्त करतात. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे व बेवारस वाहनाचे मालक मिळत नसल्याने ही वाहने वर्षानुवर्षे पोलिस ठाण्याच्या आवारात धूळखात पडून असतात. त्यामुळे तेथे  बकालपणा येतो. सुशोभीकरणालाही बाधा येते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एक कोटीचा मुद्देमाल दिला परत
वाकड पोलिस विभागाने एक कोटींचा मुद्देमाल मूळ मालकाला परत दिला. वाकड, हिंजवडी, सांगवी हद्दीतील चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, मोबाईल, वाहने व रोकड यांचा शोध पोलिसांनी घेतला. यामध्ये मागील वीस वर्षांपासून दाखल असलेल्या गुन्ह्यातील ऐवजाचा समावेश होता. या उपक्रमांतर्गत ४९ गुन्ह्यांतील एक कोटी ४८ हजार ५९६ रुपयांचा ऐवज परत देण्यात आला. 

आगीच्या घटना 
पोलिस ठाण्याच्या आवारातील वाहनांना आग लागल्याच्या दोन घटना मागील महिनाभरात घडल्या आहेत. यामुळे ठाण्याच्या आवारात धोकादायक परिस्थिती निर्माण होते.

या कायद्याचा घेऊ शकतात आधार
गुन्ह्यातील सापडलेला फिर्यादीचा मुद्देमाल सुरक्षित ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्यास सीआरपीसी १०२ (३) अंर्तगत तो मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकाला परत देण्याचा अधिकार पोलिसांना आहे. या कायद्याचा आधार घेत पोलिस तो मुद्देमाल परत करू शकतात. मात्र, पोलिसांच्या उदासीनतेमुळे मुद्देमाल परत देण्यास मुहूर्त लागत नाही.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com