बावधन येथे हातभट्टी दारूसह दोन वाहने जप्त; दोन जणांना अटक 

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 7 January 2021

हिंजवडी पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलिसांनी रात्री 11 वाजता सापळा रचून थांबून बावधनमध्ये धडक कारवाई केली.

कोळवण(पुणे) : हिंजवडी पोलिसांनी बावधन येथे हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दारूसह दोन चारचाकी वाहने असा एकूण 1,06,250 रुपये किमतीचा माल जप्त केला.

विषारी वायूची गळती होऊन चार कामगारांचा मृत्यू

हिंजवडी पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलिसांनी रात्री 11 वाजता सापळा रचून थांबून बावधनमध्ये धडक कारवाई केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील सन डे-मन डे हॉटेलसमोर सेंट्रो-हुंडाई कार तसेच इंडिका डीएलएक्‍स कार अशा दोन मोटारी थांबल्या होत्या. त्यांची तपासणी करताना सेंट्रो कारमधील चालक अशोक श्‍याम जाधव (वय 27, रा. उत्तमनगर बावधन) व इंडिका कार चालक सुभाष नारायण राठोड (वय 49, रा. उत्तमनगर बावधन) याच्याकडे 7 काळ्या रंगाचे तयार हातभट्टी दारू भरलेले कॅन असा एकूण 1,22,250 रुपये किमतीची माल मिळून जप्त करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two arrested and Two vehicles with liquor were seized at Bawadhan

Tags
टॉपिकस
Topic Tags: