आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग घेतल्याप्रकरणी पिंपरीत दोघांना अटक  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two arrested for betting on IPL cricket match in Pimpri-Chinchwad

​वैभवनगर येथे दोनजण आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शुक्रवारी (ता. 25) रात्री साडेआठच्या सुमारास वैभवनगर येथील साई आंगण हॉटेलसमोर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले.

आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग घेतल्याप्रकरणी पिंपरीत दोघांना अटक 

पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेकायदेशीररित्या बेटींग घेणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पिंपरीतील वैभवनगर येथे करण्यात आली. 

पिंपरी-चिंचवड शहरात आज 49 जणांचा मृत्यू

लालचंद देविदास शर्मा (वय 49, रा. सुखवानी एम्पायर, पिंपरी), चेतन जयरामदास कोटवाणी (वय 50, रा. सी ब्लॉक, 3/15, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वैभवनगर येथे दोनजण आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शुक्रवारी (ता. 25) रात्री साडेआठच्या सुमारास वैभवनगर येथील साई आंगण हॉटेलसमोर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार मोबाईल, नोटबु, पेन, कॅल्क्‍युलेटर, एक मोटार व पाच हजार 850 रूपयांची रोकड असा एकूण 24 लाख 27 हजार 950 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे. 
ही कारवाई वरिष्ठ निरिक्षक मिलिंद वाघमारे, निरिक्षक राजेंद्र निकाळजे, उपनिरिक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

loading image
go to top