esakal | बनावट रेशन कार्ड तयार करणाऱ्या दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Ration-Card

बनावट शिधापत्रिका तयार करून त्यावर परिमंडळ अधिकारी कार्यालयाचा खोटा शिक्का मारून सह्या केल्या. त्यानंतर शिधापत्रिका देतो असे सांगून नागरिकांकडून पैसे गोळा करणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, रास्त दुकानदारांचा मनमानी कारभार, सतत बंद असणाऱ्या पॉस मशीन याबाबत "सकाळ'ने दोन दिवसांपुर्वीच वृत्त प्रसिद्ध केले होते. अशातच आता बनावट शिधापत्रिकांचा आणखी एक गैरकारभार समोर आला आहे.

बनावट रेशन कार्ड तयार करणाऱ्या दोघांना अटक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - बनावट शिधापत्रिका तयार करून त्यावर परिमंडळ अधिकारी कार्यालयाचा खोटा शिक्का मारून सह्या केल्या. त्यानंतर शिधापत्रिका देतो असे सांगून नागरिकांकडून पैसे गोळा करणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, रास्त दुकानदारांचा मनमानी कारभार, सतत बंद असणाऱ्या पॉस मशीन याबाबत "सकाळ'ने दोन दिवसांपुर्वीच वृत्त प्रसिद्ध केले होते. अशातच आता बनावट शिधापत्रिकांचा आणखी एक गैरकारभार समोर आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अल्ताफ महंमद शेख (वय 29, रा. जय मल्हार हौसिंग सोसायटी, टॉवर लाईन, त्रिवेणीनगर, तळवडे), राजेंद्र दादा कसबे (वय 55, रा. स्वराज कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) अशी बनावट शिधापत्रिका तयार केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यातील हवालदार सतीश ढोले यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी शिधापत्रिका काढून देतो असे सांगत नागरिकांकडून पैसे घेतले. त्यांना कोणताही अधिकार नसताना फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट शिधापत्रिका तयार करून त्यावर परिमंडळ अधिकारी, अ विभाग, सहायक परिमंडळ अधिकारी, फ विभाग व परिमंडळ अधिकारी फ विभाग यांचे खोटे शिक्के मारून व बनावट सह्या करून खोटा दस्तऐवज तयार केला. हा सर्व प्रकार निगडीतील संत तुकाराम व्यापारी संकुलाच्या पार्किंगमध्ये घडला. निगडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

लोणावळ्यात पर्यटकांची विकेंडला फुल्ल गर्दी!

दरम्यान, कुटुंबात जेवढे सदस्य आहेत त्यानुसार धान्य मिळायला हवे; पण त्यानुसार गहू-तांदूळ मिळत नाहीत. कित्येकदा सरकारकडून माल आला नसल्याचे दुकानदारांकडून सांगितले जाते. धान्याची पावती द्यायलाही दुकानदार टाळाटाळ करतो. दुकानातील पॉस मशीन सतत बंद असते. ऑनलाइन किंवा हाताने लिहिलेली पावती अनेक महिन्यांपासून दिली नसल्याच्या तक्रारी शिधापत्रिकाधारकांकडून केल्या जात आहेत. रेशन दुकानदार शासनाच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येते. 

पिंपरी चिंचवडमध्ये एका पोलिस उपायुक्तांची बदली; 3 सहायक आयुक्तांची नियुक्ती

एजंटांचा विळखा 
निगडीतील परिमंडळ कार्यालयाच्या आवारात शिधापत्रिकाधारक जाताच त्याला एजंट अक्षरश: विळखा घालतात. कार्यालयात पोहोचण्यापुर्वीच त्याला अनेक प्रश्‍न विचारून हैराण केले जाते. यामुळे शिधापत्रिकाधारकाचा देखील गोंधळ उडतो.

Edited By - Prashant Patil