Dehu : इंद्रायणी नदीत दोन लहान सख्खे भाऊ बुडाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indrayani River
देहू : इंद्रायणी नदीत दोन लहान सख्खे भाऊ बुडाले

देहू : इंद्रायणी नदीत दोन लहान सख्खे भाऊ बुडाले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देहू - देहूतील सिद्धेश्वर मंदिराजवळील इंद्रायणी नदीत दोन लहान सख्खे भाऊ बुडाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता घडली.

अप्पर तहसीलदार गीता गायकवाड, पोलिस निरीक्षक प्रताप दळवी, पीएमआरडी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अग्नीशमन दल घटना स्थळ दाखल झाले आहे असून शोधत सुरू आहे.

हेही वाचा: इंद्रायणीचे काळवंडलेले पाणी स्वच्छ कधी होणार?

साहिल विजय गौड (वय10) आणि अखिल विजय गौड (वय 8, रा. सिद्धेईश्वर मंदिर, देहू, मूळगाव : गोरखपूर, कुशिनगर) अशी बुडाल्याची नावे आहेत.

सध्या इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. नदीच्या काही अंतरावर बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी मुलांचे वडील बिगारी कामगार आहे. सकाळी अंघोळसाठी लहान मुले गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. एनडीआरएफचे पथकही दाखल झाले आहे असून शोध सुरू आहे.

loading image
go to top