
महापालिकेच्या निविदांसाठी बॅंक गॅरंटीपोटी बनावट एफडीआर सादर करणाऱ्या आणखी दोन ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी एका ठेकेदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
पिंपरी - महापालिकेच्या निविदांसाठी बॅंक गॅरंटीपोटी बनावट एफडीआर सादर करणाऱ्या आणखी दोन ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी एका ठेकेदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
निगडीतील गुन्हेगार 'चंडालिया' टोळीवर मोका
बी. के. कन्स्ट्रक्शन ॲण्ड इंजिअरिंग कंपनीचे मालक परमेश्वर हनुमंत क्यातनकेरी (वय ५०, रा. पार्श्वनाथ सोसायटी रोड, पुणे) असे अटक केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. तर, राधिका कन्स्ट्रक्शनचे मालक अटल प्रितमदास बुधवानी (वय ६१, रा. संचेती स्कुलजवळ, थेरगाव) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महापालिका स्थापत्य विभागाचे लेखा अधिकारी रमेशकुमार विठ्ठलराव जोशी यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
क्यातनकेरी यांनी २६ जून २०१९ ते १० जुलै २०२० या कालावधीत महापालिकेची १७ लाख ५६ हजार रुपये किमतीची स्थापत्य विषयक दोन कामे घेतली होती. त्यांनी टीजेएसबी बॅंकेची ३६ हजार रुपये बॅंक गॅरंटी महापालिकेला सादर केली होती. ही बनावट एफडीआर असल्याचे समोर आले आहे. तसेच, बुधवानी यांनी २० डिसेंबर २०१९ ते १३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत पालिकेची ११ कोटी ४० लाख ४१ हजार ३११ रुपयांची स्थापत्य विषयक तीन कामे घेतली होती. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र बॅंकेची दोन कोटी ९८ लाख ५० हजार रुपये बॅंक गॅरंटी सादर केली होती. ही बॅंक गॅरंटी बनावट असल्याचे समोर आले.
आईची कबुतरावर मोहमाया; लेकाच्या साथीनं सावत्र मुलावर केला प्राणघातक हल्ला
Edited By - Prashant Patil