पिंपरी : नेहरूनगरमध्ये भुयारी गटार योजनेचे काम पुन्हा सुरू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अमृत योजनेंतर्गत नेहरूनगर परिसरात भुयारी गटार योजनेचे काम हाती घेतले होते.

पिंपरी : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अमृत योजनेंतर्गत नेहरूनगर परिसरात भुयारी गटार योजनेचे काम हाती घेतले होते. परंतु, कोरोनामुळे सहा महिने काम बंद केले होते. आता पुन्हा एकदा नवीन सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच, काही जीर्ण वाहिनीला पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवडमधील रस्ते जलमय; सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस 

शहरातील सांडपाणी व्यवस्था सुधारण्यासाठी अमृत योजनेतून ही कामे पूर्ण करण्याचा निर्णय झाला आहे. त्यातून महापालिकांना मदत केली जाणार आहे. फेब्रुवारी 2020मध्ये संतोषी माता चौकात भुयारी गटार योजनेसाठी खोदकाम सुरू होते. परंतु, कोरोनामुळे लॉकडाउन लागू झाल्याने सगळीच कामे बंद केली होती. आता सहा महिन्याच्या विश्रांतीनंतर सांडपाणी वाहिनीच्या कामाला सुरुवात केली आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात या भागासाठी स्वतंत्र भुयारी गटार करण्याचे नियोजन आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाबत समुपदेशन; आतापर्यंत 15 हजारांवर नागरिकांचं शंकासमाधान

नव्या अमृत योजनेतून आताच्या नेहरूनगर परिसरातील जुन्या सांडपाणी वाहिनीच्या शेजारीच दीड किलोमीटरची पर्यायी नवी वाहिनी टाकली जात आहे. शहराच्या सांडपाणी व्यवस्थेत सुधारणा होऊन या वाहिनीद्वारे वाहून येणारे सांडपाणी थेट नाल्यात सोडण्यात येणार आहे. त्यात नेहरूनगरमधील संतोषी माता चौक, जैन मंदिर परिसराचा समावेश आहे. दरम्यान, स्थानिक नगरसेवक राहुल भोसले म्हणाले, ""या परिसरात नव्या सांडपाणी वाहिनीची गरज होती. म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात काम पूर्ण होईल.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: underground drainage line work resumes in nehrunagar pimpri