esakal | पिंपरी-चिंचवड महापालिका विषय समित्यांच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड महापालिका विषय समित्यांच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड 
  • म्हेत्रे, लोखंडे, गव्हाणे, केंदळे, पवार यांना संधी 

पिंपरी-चिंचवड महापालिका विषय समित्यांच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी (ता. 19) अर्ज दाखल करण्यात आले. विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार न दिल्याने भाजपच्या पाचही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी (ता. 23) सकाळी अकरा वाजता होणार आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ होती. सत्ताधारी भाजपने विधी समितीच्या अध्यक्षपदी स्वीनल म्हेत्रे. महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी चंदा लोखंडे. शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी सोनाली गव्हाणे. कला-क्रीडा-सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षपदी उत्तम केंदळे. शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी मनीषा पवार यांना संधी दिली. 

असे आहेत सदस्य 

महापालिकेच्या प्रत्येक विषय समितीत नऊ सदस्य आहेत. प्रत्येक समितीत अध्यक्षांसह भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन व शिवसेनेचा एक सदस्य आहे. संख्या बलानुसार भाजपच्याच सदस्याला अध्यक्षपदाची संधी मिळेल, हे स्पष्ट होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाच विषय समितींच्या सभापतीपदासाठी सोमवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत अर्ज दाखल करायचे होते. सत्ताधारी भाजपच्या पाच नगरसेवकांनी अर्ज दाखल केले आहेत. विषय समित्यांमध्ये बलाबल कमी असल्याने विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपने शिक्षण समितीपदी मनीषा पवार यांना सलग दुसऱ्यावेळी तर स्वीनल म्हेत्रे आणि सोनाली गव्हाणे यांना पुन्हा एकदा सभापतीपद दिले आहे.

कॅनडाहून पोस्टाने मागविला गांजा; लोणावळ्यात एनसीबीची मोठी कारवाई

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, ''पालिकेच्या पाचही विषय समित्यांमध्ये सत्ताधारी भाजपचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ तीन सदस्य आहेत. बलाबल नसल्याने आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत.''

महापालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता विषय समितींच्या सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद कामकाज पाहणार आहेत.

स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड देशात 41 वे, राज्यात चौथे स्थान प्राप्त

दरम्यान, विषय समितीच्या निवडणुका राज्य सरकारने लांबणीवर टाकल्या होत्या. पालिकेतील समित्यांची मुदत 14 जून रोजी संपल्याने बरखास्त झाल्या होत्या. अनलॉकमध्ये राज्य सरकारने ऑनलाईन सभेद्वारे निवडणुका घेण्यास पुन्हा परवानगी दिली आहे. नव्याने विषय समित्यांचे गठन केले आहे. त्यानुसार महापालिकेच्या विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक आणि  शिक्षण समितीत 13 ऑक्टोबर रोजी झालेल्या  महासभेत सदस्यांची निवड करण्यात आली होती.