
पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील वातावरणात गुरुवारी (ता. 18) दुपारपासून अचानक बदल झाला. सोसाट्याचा वारा सुटल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडाली. हवेतील धूळ व ढगही दाटून आल्याने अंधार लवकर पडला. त्यातच पावसानेही हजेरी लावली. यामुळे शहरवासीयांची धांदल उडाली.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील वातावरणात गुरुवारी (ता. 18) दुपारपासून अचानक बदल झाला. सोसाट्याचा वारा सुटल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडाली. हवेतील धूळ व ढगही दाटून आल्याने अंधार लवकर पडला. त्यातच पावसानेही हजेरी लावली. यामुळे शहरवासीयांची धांदल उडाली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शहरात दुपारपर्यंत ऊन जाणवत होते. मात्र, चार नंतर वातावरण बदलू लागले. सोसाट्याचा वारा सुटल्याने हवेत मोठ्याप्रमाणात धूळ पसरली. यामुळे रस्त्यावरील स्पष्ट दिसत नव्हते. हवेत गारवा निर्माण झाला. सायंकाळी सहाला विजाही कडाडाटासह पावसाळा सुरुवात झाली.
सॅल्युट! 'त्या' पोलिस महिला अधिकाऱ्याला; धावाधाव करून बाळाला वाचवलं (VIDEO)
अचानक बदललेल्या वातावरणामुळे अनेकांची धांदल उडाली. सायंकाळची वेळ असल्याने कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. छत्री, रेनकोट सोबत नसल्याने पावसात भिजावे लागले. तर काहींनी पावसापासून बचाव करण्यासाठी पूल, झाडांचा आसरा घेतला. वाहन चालविताना समोरील स्पष्ट दिसत नसल्याने वाहन रस्त्याकडेला उभे केल्याचे दिसून येत होते. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील ग्रेड सेपरेटरमध्ये ठिकठिकाणी दुचाकीचालक थांबले होते यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तर काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.
Edited By - Prashant Patil