UPSC Exam Result : ताथवडेची सून जान्हवी नवले युपीएससी परीक्षेत देशात १४५ वी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत (युपीएससी) ताथवडेतील रहिवाशी व ज्येष्ठ नेते माजी खासदार विदुरा नवले यांच्या नातसून जान्हवी सुमेश नवले यांनी दुसर्‍यांदा यश संपादन केले आहे.
Janhavi Navale
Janhavi Navalesakal

- बेलाजी पात्रे

वाकड - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत (युपीएससी) ताथवडेतील रहिवाशी व ज्येष्ठ नेते माजी खासदार विदुरा नवले यांच्या नातसून जान्हवी सुमेश नवले यांनी दुसर्‍यांदा यश संपादन केले आहे. जान्हवी १४५ रँक मिळवून उत्तीर्ण झाल्याचे समजताच नवले कुटुंबिय व ताथवडेकरांनी जल्लोष केला.

देशात १४५ वा क्रमांक मिळविलेल्या जान्हवी २०२० च्या नागरी सेवा परीक्षेतपण त्यांची निवड झाली होती व सध्या त्या दिल्ली येथे कार्यरत आहेत. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी घेतलेली आहे.

अभ्यासातील सातत्य व चिकाटी तसेच घरातील मंडळींचा पाठिंबा यामुळे हे यश संपादन करू शकल्याचे त्या सांगतात. माजी खासदार विदुरा नवले यांच्या त्या नातसून आहेत व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांच्या त्या कन्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com