परदेशी जाणाऱ्यांना आज लस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

परदेशी जाणाऱ्यांना आज लस

पिंपरी : महापालिकेकडे कोव्हिशिल्ड लशीचे सहा हजार ९०० व कोव्हॅक्सिन लशीचे दोन हजार ४०० डोस उपलब्ध झालेले आहेत. ते देण्याची व्यवस्था शनिवारी (ता. २८) अनुक्रमे ६० व आठ अशा ६८ केंद्रांवर केली आहे. दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे. स्तनदा माता व गरोदर महिलांसाठी काही डोस राखीव ठेवले आहेत. तसेच, परदेशात जाणाऱ्यांसाठी पहिला व दुसरा डोस देण्याची व्यवस्था पिंपरीतील नवीन जिजामाता रुग्णालयात केली आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविले आहे. (PCMC News)

कोव्हिशिल्डचे ६९००, कोव्हॅक्सिनचे २४०० डोस

कुटे हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, शिवतेजनगर येथील स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. मात्र, पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे.

हेही वाचा: राणे विरुद्ध शिवसेना; रमेश मोरेची हत्या का झाली?

प्रत्येक केंद्रावरील पाच टक्के डोस ऑनलाइन नोंदणी करून, २० टक्के डोस किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन आणि ७५ टक्के डोस ऑन दि स्पॉट नोंदणी करून दिले जातील. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे.

गरोदर महिलांना आठ केंद्रांवर लस

गरोदर महिला व स्तनदा मातांना सावित्रीबाई फुले स्कूल भोसरी, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्यादेवी होळकर स्कूल जुनी सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी आणि जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर लस दिली जाणार आहे. त्यांच्यासाठी काही डोस राखीव ठेवले असून, केंद्रावरच नोंदणी केली जाणार आहे.

Web Title: Vaccinate Foreigners Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Vaccinateforeigners
go to top