
पिंपरी : कोरोनामुळं गेल्या पाच महिन्यांचा भाजी व्यवसाय बुडाला. महापालिकेच्या एकसारख्या अतिक्रमण कारवाईनं जीवनच सैरभैर झालंय. आज इथं, तर उद्या तिथं असंच काहीसं झाल्यानं जगायचं तरी कसं? आम्हीही भूईभाडं भरतो. आमचेही आहे, त्याच ठिकाणी पुनर्वसन करा. आम्हालाही अधिकृत गाळेधारक करा म्हणजे आमच्यावर अनधिकृत म्हणून कारवाई करणार नाहीत. ही व्यथा एका महेश गुळगोंडा यांची नाही, तर सुमारे 400 भाजी विक्रेत्यांची आहे.
सावित्रीबाई फुले भाजी मंडई व टपरी, पथारी व हातगाडी संघटना या दोन संघटना एकत्र झाल्या आहेत. त्याअंतर्गत 400 भाजी विक्रेते आहेत.
गेल्या 20 वर्षांपासून ही मंडळी याठिकाणी व्यवसाय करतेय. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं लॉकडाउन केला. एप्रिलमध्ये पिंपरी रेल्वे स्थानकाशेजारील अनधिकृत भाजी मंडईवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत कायमस्वरूपी हटविण्यात आली. मात्र, त्यांची पर्यायी व्यवस्था केली नाही. त्यानंतर त्यांना तीन फुटांचे सुरक्षित अंतर ठेवण्याचे सांगत किराणा माल, भाजीची दुकाने आणि अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास सांगितल्या. मात्र, ही खरेदी करतानाही सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं अनधिकृत भाजी मंडईवर धडक कारवाई केली होती.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
विक्रेत्यांनी भाजी मंडईत येऊ नये, यासाठी पोलिस चौकी, पार्किंग आणि भीमनगर, अशा तिन्ही बाजूने दुभाजक लावण्यात आले. त्यानंतर भाजी मंडईच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अण्णा बनसोडे, महापालिकेची सहाय्यक आयुक्त अजित पवार व अभियंता अप्पासाहेब ढवळे यांच्याकडे धाव घेतली. चर्चा करून पुन्हा एकदा मंडईत विक्रीची परवानगी घेतली. केवळ 50 विक्रेतेच मंडईत बसणार. त्यांनी प्रत्येकी दोन दिवस भाजीविक्री करायची. तिसऱ्या दिवशी दुसरा विक्रेत्याला संधी द्यायची, अशा पद्धतीने नियमांची अंमलबजावणी करत विक्री सुरू केलीय. मात्र, अद्याप त्यांना महापालिकेनं लेखी परवानगी दिलेली नाही.
फुलबाजारप्रमाणेच आमचेही पुनर्वसन करा. आम्हालाही पर्यायी जागा द्या. नाहीतर आहे त्याचठिकाणी गाळ्यांची व्यवस्था करावी. महापालिकेचं भुईभाडं भरण्यास भाजीविक्रेते तयार आहेत. अनधिकृतमधून अधिकृत भाजी विक्रेत्यांचा दर्जा मिळेल.
- रमेश शिंदे, अध्यक्ष, सावित्रीबाई फुले भाजी मंडई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.