esakal | गावगाड्याच्या विकासाला कोरोनाची ‘खीळ’; ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात घट
sakal

बोलून बातमी शोधा

Recovery

गावगाड्याच्या विकासाला कोरोनाची ‘खीळ’; ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात घट

sakal_logo
By
ज्ञानेश्वर वाघमारे

वडगाव मावळ - कोरोनामुळे (Corona) सलग दुसऱ्या वर्षातही ग्रामपंचायतींच्या करवसुलीवर (Grampanchyat Tax Recovery) मोठा परिणाम (Effect) झाला आहे. गेल्या वर्षात जेमतेम ६७ टक्के वसुली (Recovery) झाली होती. त्यातही ५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे वसुलीला हातभार मिळाला होता. गेल्या वर्षीची थकबाकी (Arrears) शिल्लक असतानाच चालू आर्थिक वर्षाच्या करांची (Tax) अपेक्षित वसुली होत नसल्याने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या छोट्या-मोठ्या विकासकामांना ब्रेक लागला आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांचे पगारही रखडले आहेत. (Village Development Stop by Corona Garmpanchyat Income Less)

अशी आहे करवसुली

 • १०४ - मावळात ग्रामपंचायती

 • ३५ कोटी - कराची वार्षिक मागणी

 • २८.५० कोटी - घरपट्टी

 • ६.५० कोटी - पाणीपट्टी

 • ६७ टक्के - मार्च २०२०-२१ अखेर वसुली

सद्यःस्थिती

 • कोरोनामुळे दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट

 • लॉकडाउनमुळे उद्योग-व्यवसाय व रोजगारावर विपरीत परिणाम

 • नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले

 • दैनंदिन खर्च भागविण्यासाठी करावी लागतेय तारेवरची कसरत

हेही वाचा: खडकवासला धरण साखळीत सुमारे २९.७३ टक्के पाणीसाठा

करांची फेरआकारणीही लांबणीवर

 • जुन्या पद्धतीमध्ये प्रति चौरस फुटाला एक ते दीड रुपयापर्यंत करवसुलीची मुभा

 • २०१६ पासून स्थानिक रेडिरेकनर दराप्रमाणे प्रति चौरस मीटरप्रमाणे करवसुलीचा आदेश

 • फेरआकारणी केल्यास उत्पन्नात २५ ते ३० टक्के वाढ अपेक्षीत

घरपट्टी व पाणीपट्टी हेच उत्पन्नाचे स्रोत

 • वर्षभरात जमा होणारा मिळकतकर व पाणीपट्टी हाच ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत

 • पंधरा टक्के मागासवर्गीय निधी, दहा टक्के महिला व बालकल्याण निधी व पाच टक्के अपंग कल्याण निधीची तरतूद

 • कर्मचाऱ्यांचे पगार, उर्वरित रकमेतून पाणी योजनेची देखभाल, अंतर्गत रस्ते, गटारे, पथदिवे आदी कामे

 • अगोदरची थकबाकी व चालू वर्षातील कराची अपेक्षित वसुली होत नसल्याने नियोजन कोलमडले

 • अनेक आर्थिक समस्यांना द्यावे लागतेय तोंड

 • अनेक ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

 • गावातील विकासकामांवर परिणाम

 • मागासवर्गीय, महिला व बालकल्याण तसेच अपंग निधीची तरतूद व खर्च करण्यावर मर्यादा

 • छोट्या ग्रामपंचायतींना खर्च भागवताना तारेवरची कसरत

हेही वाचा: आरक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची दिशाभूल; बाबा आढाव

गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत करवसुलीला मोठा ब्रेक लागला आहे. अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत तगादा लावून नागरिकांकडून करवसुली करता येत नाही. परंतु आर्थिक स्थिती चांगली असलेल्या नागरिकांनी तरी करांचा वेळेत भरणा करावा.

- सुधीर भागवत, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मावळ

कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या करवसुलीवर व पर्यायाने विकास कामांवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या मार्च महिन्यात कराचा भरणा केलेल्या नागरिकांनी चालू वर्षाचा भरणा करण्यासाठी पुन्हा मार्च महिन्याची वाट न पाहता त्वरित भरणा केल्यास मोठा हातभार लागेल.

- बाळासाहेब दरवडे, पंचायत विस्तार अधिकारी

loading image