esakal | मोशी परिसर सील असूनही नागरिकांचा मुक्तसंचार?
sakal

बोलून बातमी शोधा

मोशी परिसर सील असूनही नागरिकांचा मुक्तसंचार?

- मोशीत कडकडीत बंद पाळण्याची मागणी

मोशी परिसर सील असूनही नागरिकांचा मुक्तसंचार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोशी : प्रशासनाने केलेल्या दूर्लक्षामुळे भाजीविक्रेते, ऑनलाइन होम डिलिव्हरी करणारे, विविध कारणांसाठी बाहेर पडलेले वाहनचालक, पादचारी आदी नागरिक मोशी परिसरात सर्वत्र फिरताना दिसत आहेत.यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी कडकडीत बंद पाळण्याची मागणी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

गेल्या आठवड्यापासून मोशी परिसरातील विविध भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यामुळे सध्या हा परिसर सील केला आहे. नागरिक लॉकडाउनचे नियम पाळत नसल्यामुळे सध्या परिसरात रुग्णांची संख्या दहा झाली आहे. तर दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र, पुणे-नाशिक महामार्ग, देहू आळंदी बीआरटीएस रस्ता, जाधववाडी, चिखली लिंक रोड, स्पाईन रस्ता, सीएनजी पंप ते श्री नागेश्वर महाराज उपबाजार समिती मार्केट यार्ड आदी रस्त्याने वाहनचालक व पादचाऱ्यांची वाहतूक सुरू आहे.

हेही वाचा > ...असा झाला व्हॉट्सअॅपवर सेवापूर्ती कायर्क्रम

जय गणेश साम्राज्य चौक, जुना जकात नाका मार्केट यार्ड चौक, मोशी गावठाण मुख्य चौक, भारत माता चौक, रिव्हर रेसिडेन्सी चौक, लिंक रोड चौक, टाटा मोटर्स चौक, स्पाईन रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, गजानन चौक आदी चौकांसह मोशी गावठाण व प्राधिकरणअंतर्गत चौकांमध्ये हे नागरिक विविध वस्तूंच्या खरेदीची कारणे देत फिरत असल्याचे आढळून आले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कडकडीत बंदची मागणी...
श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीमध्ये किरकोळ व्यापारी गर्दी करीत होते. त्याला आळा बसावा म्हणून बाजार समितीने रात्री बारा ते पहाटे तीन असा वेळेत बदल केला आहे. तरीही काहीजण याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच, सरकारने दारूच्या दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने स्पाईन रस्त्यावरील वीर सावरकर चौकातील व मोशी गावातील दारूच्या दुकानासमोर नागरिक गर्दी करीत आहेत. वाहनचालकांची विनाकारण वर्दळीमुळेच कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे या रुग्ण संख्येला आळा बसावा, म्हणून स्थानिक उपनगरवासियांनी काही दिवस तरी मोशीत बंद पुकारण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

loading image