Two Individuals Charged for Assaulting Youth in Pimpri
Sakal
पिंपरी : तरुणाला लाथाबुक्क्यांनी व सळईने बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रावेत येथे घडली. अमोल अशोक कांबळे (वय २८) आणि अमित बापू कांबळे (वय २९, दोघेही रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर शुभम विकास चव्हाण (रा. थरमॅक्स चौक, चिंचवड) असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी त्यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.