
Wakad
sakal
वाकड : ‘थेरगावमधील डांगे चौकातील दत्त मंदिर रस्त्याकडे जाणाऱ्या वाकड फाट्यावर पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण करून पदपथांसह मुख्य रस्त्यावर कब्जा केला आहे. हे व्यावसायिक दिवसागणिक मालामाल होत असताना करदात्या रहिवाशांना दैनंदिन जीवनात हाल सहन करावे लागत आहेत. पदपथावर व्यावसायिक बसत असल्याने मला रस्त्यावरून चालावे लागते. माझा कधीही अपघात होऊ शकतो,’ अशी धक्कादायक व्यथा ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.