

Wakad School Relocation Controversy: Students' Safety Under High Voltage Power Lines Raises Concerns
esakal
वाकड : भूमकर वस्तीमध्ये २६ वर्षांपासून महापालिकेची कै. आबाजी रामभाऊ भूमकर शाळा आहे. मात्र, ही शाळा स्थलांतरित करण्याच्या हालचालींमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. खासगी बांधकाम प्रकल्पाला रस्त्याचे तब्बल एक ते दीड किलोमीटरचे ‘फ्रंटेज’ उपलब्ध करून देण्यासाठी शाळेला अडगळीत घातले जात असल्याचा आरोप होत आहे.