Wakad News : भरधाव टेम्पोने दाम्पत्याला उडविले; पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर

घराकडे पायी निघालेल्या दाम्पत्याला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे.
Lata Kamble
Lata KambleSakal

- बेलाजी पात्रे

वाकड - घराकडे पायी निघालेल्या दाम्पत्याला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात रविवारी (ता. ३) रात्री नऊच्या सुमारास डांगे चौक-हिंजवडी रस्त्यावरील काळाखडक येथील यशदाच्या गेटसमोर झाला.

लता संतोषकुमार कांबळे (वय-४८) असे अपघाततात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती संतोष कुमार (वय-४५, रा. पत्राशेड, मस्जिद समोर, काळाखडक, वाकड) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी वाकड पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कांबळे दाम्पत्याची येथील यशदा ट्रेनिंग सेंटरच्या गेटसमोर चहा नाष्ट्याची टपरी आहे. रविवारी ते नेहमीप्रमाणे टपरी बंद करून पायी घराकडे चालले असता समोरून भरधाव आलेल्या टेम्पोने या दोघांनाही जोरात धडक दिली लता यांच्या हाता-पायांना व डोक्याला गांभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सीसी टीव्हीच्या आधारे वाकड पोलीस त्या टेम्पोचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com