पिंपरीत पावसाच्या पाण्याने सोसायटीची भिंत कोसळली

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

मोरवाडी मोरजाई मंदिराजवळील म्हाडा सुखवानी लॉन्स इ बिल्डिंगच्या सोसायटीची भिंत पावसाच्या जोरदार प्रवाहाने क्षणात ढासळली. परिसरात असलेल्या चार चाकी वाहनांचे नुकसान झाले.

पिंपरी -  मोरवाडी मोरजाई मंदिराजवळील म्हाडा सुखवानी लॉन्स इ बिल्डिंगच्या सोसायटीची भिंत पावसाच्या जोरदार प्रवाहाने क्षणात ढासळली. परिसरात असलेल्या चार चाकी वाहनांचे नुकसान झाले. अचानक झालेल्या पडझडीने नागरिक भयभीत झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सिमेंट काँक्रीटीकरण मधली अंदाजे 25 ते 30 मीटर लांब व 6 फूट रूंदीची ही भिंत अचानक कोसळली. याच भागात महापालिकेचे बांधकाम सुरू आहे. त्याच्या शेजारी एक रिकामा प्लॉट आहे. पावसाचे पाणी अडून राहिल्याने भिंत कोसळल्याचे नागरिकांनी सांगितले. जवळच असलेल्या विद्युत खांबांचे बांधकाम ही ढासळण्याच्या स्थितीत आहे. महावितरणने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली. कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, सोसायटीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wall of the society collapsed due to rain water in Pimpri