'आषाढी वारीला परवानगी द्या, अन्यथा रस्त्त्यावर उतरू'; वारकऱ्यांचा इशारा

Bandatatya-Karadkar
Bandatatya-Karadkar

देहू - वारकरी संप्रदाय मानवता जपत आलाय. 'कोणत्याही जीवाचा न घडो मत्सर' ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. सरकारने काय मानवतेतून दारूची दुकाने सुरू केली का? शंभर कोटींची मागणी हप्ता म्हणून करतात. हे योग्य आहे का? आम्ही तर केवळ नियम व अटी पाळून वारकरी संप्रदायाची वारी आणि यात्रा सुरू करण्याची मागणी करत आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे ऐकून वर्षभर गप्प बसलो. आता गप्प बसणार नाही. यंदा शासनाने वारी सुरू करावी, अन्यथा संपूर्ण वारकरी संप्रदाय आंदोलन करेन, असा इशारा वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी प्रशासनाला दिला. दरम्यान वारकऱ्यांच्या मागणीचे निवेदन हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी स्वीकारले. त्यानंतर देहूतील आंदोलन स्थगित करण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देहू गावात 30 मार्च रोजी संत तुकाराम महाराज बीज सोहळा आहे. या सोहळ्यात केवळ 50 जणांच्या उपस्थितीत बीज सोहळा साजरा करण्याचे शासनाचे आदेश आहेत. तसेच शासनाने यापूर्वीही आषाढी वारी, पैठण यात्रा रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे बंडातात्या कराडकर यांनी आज, देहू येथे येऊन आंदोलन अथवा सत्याग्रह करण्याचा इशारा दिला होता. त्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक प्रमुख वारकरी यात सहभागी झाले होते. 

बंडातात्या म्हणाले, 'आषाढी वारीसाठी लाखोने भाविक पंढरपूरला येतात. पांडुरंग, माऊली, तुकोबाराय व इतर संतावर त्यांची श्रद्धा आहे. त्यासाठी ते महिनाभर पायी वाट चालतात. वर्षभर कोरोनामुळे वारी रद्द झाली. सोहळे रद्द झाले. आता पुन्हा संत तुकाराम महाराज बीज सोहळा आहे. केवळ 50 लोकांत साजरा करायचा. हे कोणालाही पटणारे नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या ताबडतोब मान्य कराव्यात. अन्यथा वारकरी रस्त्यावर येईल.' पांडूरंग महाराज घुले म्हणाले, 'सत्याची जाणीव सरकारला करून द्यायची आहे. सत्याचे पालन होत नाही. नामचिंतन चिंतनाने प्रभावी शक्ती प्राप्त होते. त्यामुळे बंधने नकोत.' राजाभाऊ चोपदार म्हणाले, 'शासनाच्या नियमांचे वारकऱ्यांनी आदर केलेला आहे.शासनाला सहकार्य केले आहे. शासनानेही आता व्यवस्थित भूमिका घेवून परवानगी द्यावी.' हवेली प्रांताधिकारी सचिन बारवकर म्हणाले, 'राज्यात कोरोना वाढलेला आहे. वारकरी परंपराही मोठी आहे. संतच जगाला वाचवणार आहे. शासनाला सर्वांच्या आरोग्याची काळजी आहे. शासनाकडे वारकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन पाठवतो.' 

एकनाथ महाराज सदगीर,रमेश महाराज वाघ,विलासदादा श्रवण,ज्ञानेश्वर महाराज जंजवळेकर व इतरांनी विचार व्यक्त केले. यावेळी आळंदीचे राजाभाऊ चोपदार, गाथा मंदिराचे पांडूरंग महाराज घुले, प्रकाश महाराज जंजवाळ, ज्ञानेश्वर महाराज जवंळेकर, गगन माऊली, प्रतिभा साठे, विलासदादा श्रवण, रमेश महाराज वाघ, एकनाथ महाराज सदगीकर, शासनाच्या वतीने प्रांताधिकारी चचिन बारवकर, तहसीलदार गीता गायकवाड, पोलिस उपायुक्त आनंद भोईटे, विलास सोंडे व इतर उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com