शहरातील नागरिकांना वर्षभर दिवसाआडच पाणी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

दररोज साधारणतः ५१० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करून शहरात वितरित केले जाते. मात्र, वाढलेली लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी आणि पाणी चोरी व गळतीचे सुमारे ३८ टक्के प्रमाण यामुळे पाणी अपुरे पडत आहे.

पिंपरी - शहरातील नागरिकांना दररोज व पुरेसे पाणी मिळावे, दिवसाआड मिळणाऱ्या पाण्यापासून सुटका व्हावी, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. रावेत अशुद्ध जलउपसा केंद्रांतील पंपिंगची आणि निगडी-प्राधिकरण सेक्‍टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात येणार आहे, असे उत्तर एक-दीड वर्षापासून प्रशासन देत आहे. प्रत्यक्षात दोन्ही ठिकाणच्या कामात संथगती असून, आजपर्यंतच्या कामात फार प्रगती झालेली नाही, त्यामुळे किमान वर्षभर तरी नागरिकांना, ‘आहे त्याच स्थितीत’ दिवसाआड पाण्यावरच तहान भागवावी लागणार असल्याचे चित्र आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात व पवना नदीत पुरेसे पाणी असताना दिवसाआड पाणी का? असा प्रश्‍न अनेकांना पडतो आहे. वास्तविकताः शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेची सध्याची यंत्रणा कमी पडत आहे. पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून वीस पंपांद्वारे अशुद्ध जलउपसा केला जातो. तेथून जलवाहिन्यांद्वारे सेक्‍टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रांत पाणी आणले जाते. दररोज साधारणतः ५१० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करून शहरात वितरित केले जाते. मात्र, वाढलेली लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी आणि पाणी चोरी व गळतीचे सुमारे ३८ टक्के प्रमाण यामुळे पाणी अपुरे पडत आहे. ५१० दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाण्याचा उपसा व शुद्धीकरण करण्याची यंत्रणा महापालिकेकडे नाही. त्या क्षमतेत वाढ करण्याची चर्चा गेल्या दीड वर्षांपासून अर्थात २५ नोव्हेंबरला दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय झाला, त्यापूर्वीपासून सुरू आहे. मात्र, त्या कामात फारसी प्रगती झालेली दिसत नाही. आजही जुन्या २० पंपांद्वारेच अशुद्ध जलउपसा केला जात आहे.

प्रेयसीच्या पतीवर प्रियकरानेच केला प्राणघातक हल्ला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water alternate day pimpri city for one year